‘ही’ अभिनेत्री करणार नरेंद्र मोदींच्या आईची भूमिका 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन- बाळासाहेब ठाकरे याच्या जीवनाची यशोगाथा सांगणारा चित्रपट आताच प्रदर्शित झाला आहे. तोपर्यत आता पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्या जीवनावर आधारित सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर आधारलेल्या या सिनेमाची चर्चा सर्वत्र रंगत आहे. सिनेमात पंतप्रधान मोदींची भूमिका अभिनेता विवेक ऑबेरॉय साकारणार आहे. अहमदाबादमध्ये शूटिंगचा नारळ फोडण्यात आला. सिनेमात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आईची भूमिका कोण साकारणार यावरुन पडदा हटवण्यात आला आहे. तर मोदींच्या आईंच्या भूमिकेत वरिष्ठ अभिनेत्री जरीना वहाब दिसणार आहेत. फिल्म ट्रेड अँनलिस्ट तरण आदर्श यांनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत ही माहिती चाहत्यांना दिली आहे.

भाजपा अध्यक्ष अमित शाह यांच्या भूमिकेत अभिनेता मनोज जोशी दिसणार असल्याचे समोर येत आहे. सिनेमात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नी जसोदाबेन यांची भूमिका अभिनेत्री बरखा बिष्टा साकारणार आहेत. सिनेमा गुजरातच्या वेग-वेगळ्या भागांमध्ये चित्रीत करण्यात येणार आहे. सिनेमात दर्शन कुमार, बोमन ईरानी, जरीना वहाब, मनोज जोशी, प्रशांत नारायण, बरखा बिष्ट सेनगुप्ता, अक्षत आर सलूजा, अंजन श्रीवास्तव, राजेंद्र गुप्ता आणि यतिन कर्येकर यांसारखे दिग्गज कलाकार मोठ्या पद्यावर दिसणार आहेत. सिनेमा विवेक ऑबेरॉय आणि ओमंग कुमार यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होत आहे.

तसेच मागील 2 वर्षांपासून  या सिनेमाची तयारी सुरू आहे. सिनेमात सर्वात आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका अभिनेता परेश रावल साकारणार होते. पण शेवटी सिनेमात विवेक ऑबेरॉयची वर्णी लागली आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us