Roll Ball World Cup Tournament In Pune | उद्यापासून (दि. 21) रंगणार रोलबॉल विश्व करंडक स्पर्धेचा थरार ! 27 देश विजेतेपदासाठी भिडणार ; चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन

पुणे : Roll Ball World Cup Tournament In Pune | सहाव्या वरिष्ठ गटाच्या विश्व करंडक रोलबॉल स्पर्धेचे बिगुल वाजले असून उद्या (दि.२१) पासून या रोमहर्षक स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत २७ देश सहभागी झाले असून विजेतेपदासाठी ते भिडणार आहेत. (Roll Ball World Cup Tournament In Pune)

ही स्पर्धा म्हाळुंगे बालेवाडी (Balewadi Mahalunge) येथील श्री शिवछत्रपती स्टेडियम येथील बॅडमिंटन हॉल (Shree Shiv Chhatrapati Sports Complex) मध्ये रंगणार आहे. स्पर्धेचे उदघाटन राज्याचे उच्च तंत्र व शिक्षणमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सायं ४ वाजता करण्यात येणार असून यावेळी पुणे महानगर पालिकेचे Pune Municipal Corporation (PMC) आयुक्त विक्रम कुमार (IAS Vikram Kumar), पिंपरी चिंचवड पालिकेचे Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) आयुक्त शेखर सिंग (IAS Shekhar Singh), पीएमआरडीएचे (PMRDA) आयुक्त राहुल महिवाल (IAS Rahul Ranjan Mahiwal) , महाराष्ट्र रोलबॉल संघटनेचे अध्यक्ष संदीप खर्डेकर (Sandeep Khardekar), रोलबॉलचे जनक राजू दाभाडे (Raju Dabhade) आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. (Roll Ball World Cup Tournament In Pune)

स्पर्धेचे उदघाटन सांस्कृतिक कार्यक्रमाने करण्यात येणार असून, यावेळी विविध कलाकार कलाविष्कार सादर करणार आहेत.

स्पर्धेची पहिली लढत पुरुष विभागातील होणार असून या लढतीमध्ये भारतासमोर पोलंड संघाचे आव्हान असणार आहे.
महिला विभागातील पहिली लढत अ गटातील नेपाळ व इजिप्त या दोन संघांदरम्यान होणार आहे.

आंतरराष्ट्रीय रोलबॉल संघटनेचे तांत्रिक समिती अध्यक्ष डॉ. आनंद यादव (Dr. Anand Yadhav) व
स्पर्धा तांत्रिक अध्यक्ष जेकब न्याऊडोह (केनिया) यांनी जाहीर केलेली गटवारी

पुरुष विभाग :

अ गट : भारत, अर्जेंटिना, इजिप्त, फिजी, पोलंड व युगांडा
ब गट : केनिया, श्रीलंका, आयव्हरी कोस्ट, फ्रान्स, इराण व सिएरा लिओन
क गट : बेलारूस, सौदी अरेबिया, नेपाळ, गिनी,ओमान व ब्राझील
ड गट: न्युझीलंड, येमेन, युएई, इंग्लंड, लॅटव्हिया

महिला विभाग

अ गट : केनिया, फ्रान्स, आयव्हरी कोस्ट, श्रीलंका, नेपाळ व इजिप्त
ब गट : भारत, पोलंड, लॅटव्हिया, अर्जेंटिना, सिएरा लिओन.

Web Title :-   Roll Ball World Cup Tournament In Pune | The thrill of the Rollball World Cup will start tomorrow (21st) in pune! 27 countries will compete for the title; Competition inaugurated by Chandrakant Patil

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Bribe Demand Case On Mahila Talathi | लाचलुचपत प्रतिबंधक विभाग : 20 हजाराच्या लाच प्रकरणी महिला तलाठीविरूध्द अ‍ॅन्टी करप्शनकडून गुन्हा

Devendra Fadnavis | ‘मुख्यमंत्र्यांनी नगरविकासासाठी रेकॉर्डब्रेक निधी दिला, पण…’, देवेंद्र फडणवीसांनी महानगरपालिका आणि नगरपालिकांच्या कार्यावर ठेवलं बोट

Pune Pimpri Chinchwad Crime Branch News | पुणे पिंपरी-चिंचवड क्राईम ब्रँच : आयपीएल क्रिकेट मॅचवर बेटिंग घेणार्‍या 3 सट्टेबाजांना तळेगाव दाभाडेमध्ये अटक (Video)