सोशल मीडियावर ‘या’ आकड्यापर्यंत पोहचणारा पहिला खेळाडू बनला रोनाल्डो

नवी दिल्ली : जगातील सर्वात महागडा आणि लोकप्रिय फुटबॉलर क्रिस्टियानो रोनाल्डोने पुन्हा एकदा आकड्यांच्या खेळात बाजी मारली. यावेळी त्याचा रेकॉर्ड मैदानाशी संबंधीत नसून सोशल मीडियाशी संबंधीत आहे. इटलीच्या जुव्हेंट्सकडून खेळणारा हा पोर्तुगाल फुटबॉलर आता सोशल मीडियावर 500 मिलियन फॉलोअर्सचा आकडा गाठणारा जगातील पहिला खेळाडू बनला आहे.

क्रिस्टियानो रोनाल्डो सोशल मीडियावर सुरूवातीलपासून अ‍ॅक्टिव्ह आहे आणि मैदानावरील त्याच्या यशामुळे त्याच्या सोशल मीडिया अकाऊंट्सशी लोक सतत जोडले जात आहेत. तो इंस्टाग्रामवर 261 मिलियन फॉलोअर्ससह इंस्टग्रामवर जगात सर्वात जास्त फॉलोअर्सवाला व्यक्ती बनला आहे.

सोशल मीडियावर रोनाल्डोला केवळ खेळ जगतातील दिग्गजच नव्हे तर अनेक क्षेत्रातील दिग्गज सुद्धा आव्हान देतात. तो अ‍ॅक्टर आणि पहेलवान ड्वेन रॉक जॉन्सन, फुटबॉलर लियोनेल मेसी आणि नेमार सारख्या दिग्गजांपेक्षा फॉलोअर संख्येत खुप पुढे गेला आहे.

तुम्ही त्याच्या रेकॉर्डचा अंदाज यावरून लावू शकता की, इंग्लिश प्रीमियर लीगच्या 20 फुटबॉल क्लबचे मिळून जेवढे फॉलोअर्स आहेत (159 मिलियन), एकट्या रोनाल्डोचे त्याच्यापेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. सोशल मीडियावरून रोनाल्डोला मोठी कमाईसुद्धा होते आणि येथून कमाई करण्याच्या बाबतीत सुद्धा तो अनेक दिग्गजांच्या खुप पुढे आहे.