दुर्देवी ! 70 फुटावरून कोसळली ‘कॅप्सूल’ लिफ्ट ; उद्योजक, मुलगी, जावयासह 6 ठार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मध्य प्रदेशमधील प्रसिद्ध उद्योगपती आणि पाथ इंडियाचे डायरेक्टर पुनीत अग्रवाल आणि त्यांच्या कुटुंबियांवर काळाने झडप घातली आहे. दरम्यान, पुनीत अग्रवाल त्यांच्या पत्नी, मुलगी, जावई, नातू आणि मुंबईत राहणाऱ्या तीन नातेवाईकांसह थर्टी फस्टच्या पार्टीसाठी यांच्या पातालपानी येथील फार्म हाऊसवर गेले होते. त्या ठिकाणी बनलेल्या टॉवरवर कॅप्सूल लिफ्ट बसविण्यात आली होती. याच कॅप्सूल लिफ्टने सर्व खाली उतरत असताना लिफ्ट 70 फूट ऊंचीवरून खाली कोसळली. ज्यामूळे सर्वजण थेट खाली फेकले गेले. या दुर्दैवी अपघातात उद्योगपती पुनीत (53) , मुलगी पलक (27), जावई पलकेश अग्रवाल(28), नातू नव (3), मुंबईत राहणारे पलकेश यांचे मेहुणे गौरव (40) आणि मुलगा आर्यवीर (11) या सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर, गौरव यांची पत्नी निधी गंभीर जखमी आहे.

महू एएसपी धर्मराज सिंह मीणा यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाथ इंडियाचे डायरेक्टर पुनीत अग्रवाल आपली मुलगी, जावई आणि इतर कुटुंबियांसोबत फार्म हाऊसवर थर्टीफस्तनिमित्त पिकनिकसाठी आले होते. यावेळी, उद्योगपती पुनीत अग्रवाल यांच्यासह सात जण सायंकाळचे नैसर्गिक सौंदर्य पाहण्यासाठी 5 वाजून 30 मिनिटांनी फार्म हाऊस परिसरात असलेल्या टॉवरवर कॅप्सूल लिफ्टने गेले. मात्र, उतरताना लिफ्ट 70 फूट ऊंचीवरून जमिनीवर कोसळली. सर्व जण फुटबॉल सारखे खाली फेकले गेले. दरम्यान, घटनास्थळी उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्याने घटनेची माहिती पोलिसांना देताच सगळ्यांना तातडीने मेवाडा हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. नंतर सगळ्यांना चोइथराम हॉस्पिटलमध्ये रवाना करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच पुनीत अग्रवाल यांच्यासह मुलगी, जावई आणि 6 जणांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. फार्म हाऊसचा चौकीदार कैलाश हा लिफ्ट रिमोटने ऑपरेट करत होता. घटनेच्या वेळी पुनीत यांचा मुलगा निपुन हा टॉवरवरच थांबला असल्याने तो थोडक्यात बचावला.

महू बंदची हाक :

या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर बुधवारी महू येथे बंदची हाक देण्यात आली आहे. पुनीत अग्रवाल यांच्या जनसंपर्क दांडगा होता. त्यामुळे इंदूर ते मुंबईपर्यंत त्यांचा मित्र परिवारात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, पुनीत यांना लाॅन टेनिसची आवड होती. ते विंबलडन पाहण्यासाठी लंडनला जात होते. डेली कॉलेजमध्ये आयोजित मध्यप्रदेश स्टेट रॅंकिंग मेन डबल्स टेनिस स्पर्धेत ते सहभागी झाले होते. पातालपानी येथील आपल्या फॉर्म हाऊसमध्ये त्यांनी खास टेनिस कोर्ट देखील बनवले होते.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

मधुमेह असल्यास आहारामध्ये करा ‘या’ ४ पदार्थांचा समावेश
‘हे’ ७ उपाय केल्यास सतत येणारा थकवा जाईल पळून, जाणून घ्या
जेवण पॅक करण्यासाठी ‘फॉईल पेपर’ वापरता ? ‘हे’ ७ दुष्परिणाम जाणून घ्या
मासिक पाळीत स्वच्छता राखण्यासाठी ‘या’ ६ गोष्टी लक्षात ठेवा !
गूळ खाण्याने वाढते वजन, जास्त खाण्याचे ‘हे’ ६ तोटे जाणून घ्या
मातेच्या स्तनपानामुळे बाळांना होतात ‘हे’ ६ फायदे, जाणून घ्या
लवंग खाण्याचे ‘हे’ ६ आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहीत आहेत का ?