‘रोज व्हॅली’ चीट फंड घोटाळा : ED चं अभिनेत्री रितुपर्णा सेनगुप्ताला ‘बोलावणं’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रोज व्हॅली चिट फंड घोटाळ्याप्रकरणी ईडीने टॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस रितुपर्णा सेनगुप्ताला चौकशीसाठी बोलावलं आहे. याआधी ईडीने अ‍ॅक्टर प्रोसेनजीत चटर्जीला नोटीस पाठवून 19 जुलै रोजी हजर राहण्यासाठी सांगितले होते. आरोपांनुसार, रोज व्हॅली घोटाळ्यात रोज व्हॅली ग्रुपने वेगवेगळ्या योजनांचे आमिष दाखवून पैसे लुबाडले आहेत.

प्रोसेनजीत चटर्जीची मनी लाँड्रिंग अ‍ॅक्टनुसार चौकशी

याआधी अभिनेता प्रोसेनजीत चटर्जीला ईडीने रोज व्हॅली घोटाळ्या प्रकरणी नोटीस पाठवली होती. ईडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले स की, “चटर्जीची मनी लाँड्रिंग अ‍ॅक्टनुसार, चौकशी होणार आहे. सीबीआयने दाखल केलेल्या एफआयआर च्या आधारावर ईडीने या प्रकरणी केस दाखल केली आहे.

रोज व्हॅली चिच फंड घोटाळ्याचा 2013 साली खुलासा

ईडी अधिकाऱ्यांनुसार, समूहाचे अध्यक्ष गौतम कुंडू संचालित रोज व्हॅली चिट फंड घोटाळ्याचा 2013 मध्ये खुलासा करण्यात आला. समूहाच्या कथित वेगवेगळ्या योजना चालवण्यासाठी 27 कंपन्या बनवण्यात आल्या होत्या. यात पश्चिम बंगाल, आसाम आणि बिहार मधील जमाकर्त्यांचे कथित 17,250 कोटी रुपये जमा करण्यात आले होते.

शुभप्रसन्ना आणि शिवाजी पांजा यांनाही बोलावणं

या प्रकरणी बंगाली कलाकार शुभप्रसन्ना आणि व्यापारी शिवाजी पांजा यांना बोलावण्यात आलं होतं. शुभप्रसन्ना यांना शारदा चीट फंड घोटाळ्याप्रकरणी बोलावण्यात आलं होतं. तर शिवाजी पांजा यांना रोज व्हॅली तपासा प्रकरणी बोलावण्यात आलं होतं. हे दोघेही पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि त्यांच्या पार्टीचे जवळचे मानले जातात.

अकाली केस ‘पांढरे’ का होतात ? जाणून घ्या कारणे

कष्टाची कामे न करणाऱ्यांनी ‘लठ्ठपणा’ असा कमी करावा

‘या’ 5 प्रमुख कारणांमुळे हातापायांना ‘मुंग्या’ येतात, जाणून घ्या ‘उपाय’

‘स्पर्म काऊंट’ वाढवण्यासाठी मध आणि आवळा ‘रामबाण’ उपाय ; ‘असे’ करा सेवन !

जेवणानंतर ‘या’ गोष्टींचे सेवन कटाक्षाने टाळा ; अन्यथा …

अ‍ॅसिडीटीला मुळापासून संपवा, करा ‘हा’ नैसर्गिक उपाय