Roshan Bhinder | वेब सीरिजच्या नावाखाली 37 लाखांच्या फ़सवणुकीप्रकरणी ‘या’ प्रसिद्ध दिग्दर्शिकेला अटक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – Roshan Bhinder | बॉलीवूडमधून (Bollywood) एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. यामध्ये प्रसिद्ध निर्माती-दिग्दर्शिका (Producer-director) रोशन बिंदरला (Roshan Bhinder) वेब सीरिजसाठी (Web Series) घेतलेल्या 37 लाख रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी (Crime News) वर्सोवा पोलिसांनी (Versova police) अटक केली आहे. अंधेरीतील यारीरोड-वर्सोवा परिसरात राहणाऱ्या एका 50 वर्षीय महिलेने यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे.

तक्रारदार महिलेच्या इमारतीत अभिनेता हितेन तेजवानी (hiten tejwani) राहतो. तक्रारदार महिला, हितेन आणि रोशन बिंदर (Roshan Bhinder) या तिघांनी मिळून एक वेब सीरिज बनवण्याचा निर्णय घेतला होता. हितेनच्या सांगण्यावरून तक्रारदार महिलेने 37 लाख रुपये या वेब सीरिजसाठी गुंतवले होते.द अदर्स (डी कोड) नावाची ही वेब सीरीज पूर्ण झाल्यानंतर त्याचे हक्क हार्ड डिस्क, उल्लू डिजिटल प्रायव्हेट लिमिटेड चॅनेलला (Ullu Digital Private Limited Channel) विकून त्यातून मिळालेली रक्कम तिघे समान वाटून घेणार होते.

त्यासाठी या तिघांच्या नावाने एक संयुक्त खाते उघडण्यात आले होते.
मात्र बँकेत जमा झालेल्या या पैशांचा रोशन बिंदर (Roshan Bhinder) यांनी परस्पर अपहार करुन त्यांची फसवणूक (Fraud) केल्याचा आरोप या महिलेने केला आहे
हि तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी रोशन बिंदरविरोधात गुन्हा (Crime News) दाखल करून त्यांना अटक केली आहे.
रोशन या दिवंगत दिग्दर्शक गॅरी बिंदर (Gary Bhinder) यांच्या पत्नी आहेत.
गॅरी हे एकता कपूरच्या (Ekta Kapoor) बालाजी टेलिफिल्म्समध्ये (Balaji Telefilms) काम करत होते.

Web Title : Roshan Bhinder | director of ekta kapoors television shows roshan bhinder arrested in a cheating case versova police station

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Crime News | शाळेची बस सुटल्याने 14 वर्षीय विद्यार्थ्याने उचलले ‘हे’ टोकाचं पाऊल

MLA Nitesh Rane | ‘ठाकरे सरकारला पाटलाच्या नाही तर खानच्या पोराची चिंता’ – नितेश राणे

IPL 2022 | आयपीएलच्या टीमना बाहेर खेळण्याची परवानगी द्या, BCCI कडे मागणी

Chala Hawa Yeu Dya Maharashtra Daura | ‘चला हवा येऊ द्या’च्या निलेश साबळेंनी नारायण राणेंची पाया पडून मागितली माफी; जाणून घ्या प्रकरण

Nanded Crime | दारूसाठी पैसे देत नसल्याच्या कारणावरून जन्मदात्या बापाचा केला खून