Roshni Shinde Beating Case | ठाण्यातील राड्यानंतर मोठी घडामोड, रोशनी शिंदेवर गुन्हा दाखल; ठाकरे गटाला मोठा धक्का

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – Roshni Shinde Beating Case | शिवसेना उद्धव ठाकरे गट (Shiv Sena Uddhav Thackeray Group) आणि शिवसेना शिंदे गटामध्ये (Shinde Group) ठाण्यात जोरदार राडा झाला. शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी ठाकरे गटाच्या रोशनी शिंदे यांना मारहाण केली. यामध्ये जखमी झालेल्या रोशनी शिंदे यांची भेट घेण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) आणि आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) हे रुग्णालयात पोहोचले. यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारवर टीकास्त्र करताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे ‘फडतूस गृहमंत्री’ असल्याचे वक्तव्य केल्याने राजकीय वातावरण तापलं आहे. यातच आता रोशनी शिंदे मारहाण प्रकरणात (Roshni Shinde Beating Case) मोठी घडामोड घडली आहे. यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.

ठाण्यातील ठाकरे गटाच्या कर्यकर्त्या रोशनी शिंदे यांच्या विरोधात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) व पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात (Kasarvadvali Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवसेना पदाधिकारी बाळा गवस यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर संध्याकाळी शिंदे गटाचे कार्यकर्ते पोलीस आयुक्तालयात दाखल झाले. यात नरेश म्हस्के (Naresh Mhaske), माजी उपमहापौर मिनाक्षी शिंदे (Former DyMayor Meenakshi Shinde) हे देखील होते. त्यांनी ठाणे अतिरिक्त पोलीस आयुक्तांची भेट घेतली आणि रोशनी शिंदे विरोधात तक्रार केली. (Roshni Shinde Beating Case)

नरेश म्हस्के म्हणाले, सिव्हिल हॉस्पिटल आणि संपदा हॉस्पिटलने दिलेल्या वैद्यकीय अहवालातून स्पष्ट होत आहे
की तिला मारहाण झालेली नाही आणि ती गर्भवती नाही.
त्यांनी पोलिसांवर देखील चुकीचे आरोप केलेत अपशब्द वापरलेत.
खासदार राजन विचारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बनाव करुन त्या महिलेला जबाब द्यायला सांगितले.
त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही आयुक्तालयातून जाणार नाही.
मुख्यमंत्र्यांच्या विरोधात नारायण राणे बोलले होते म्हणून त्यांना जेवणाच्या ताटावरुन ताब्यात घेवून अटक केली होती.
मग त्यांच्यावर पण कारवाई झालीच पाहिजे.
उद्या जर आमच्या कार्यकर्त्यांचा बांध तुटला तर त्याला जबाबदार ठाकरे गट असेल असा इशारा म्हस्के यांनी दिला आहे.

 

Web Title :- Roshni Shinde Beating Case | A big development after the rally in Thane, case filed against Roshni Shinde; A big blow to the Thackeray group

 

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Desai Trophy | एच व्ही देसाई महाविद्यालयाने पटकावली देसाई करंडकची ‘चॅम्पियन ट्रॉफी’

Pune Pimpri Chinchwad Crime | मुंबई पोलीस उपायुक्ताच्या नावाने महिलेला लाखोंचा गंडा, पिंपरी चिंचवडमधील प्रकार

Jayant Patil | जयंत पाटलांचे देवेंद्र फडणवीसांना खुलं आव्हान, म्हणाले – ‘पुढील 48 तासांत…’

Indrani Balan Foundation | ‘इंद्राणी बालन फाऊंडेशन’ स्वीकारणार काश्मीरमधील दहशतवादग्रस्त कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाचे पालकत्व; पुनीत बालन यांची घोषणा