रोटरी क्लब निस्वार्थीपणे समाजसेवेत व्यस्त : डॉ. कुलदीपक चरक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – आरसीपीएमसी शिक्षण आणि कौशल्य, वैद्यकीय, आरोग्य सेवा आणि सामाजिक परिणाम या क्षेत्रांत अनेक उपक्रम राबविले जातील. रोटरी क्लब समाजासाठी नि:स्वार्थ सेवेमध्ये व्यस्त आहे आणि आरसीपीएमसी सतत वंचितांना मदत करण्यासाठी लक्षपुर्वक प्रयत्न करीत राहील, असे मत नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. कुलदीपक चरक यांनी व्यक्त केले.

शहरातील जवळचे घर ( क्लोजर होम इन अवर सिटी ) रोटरी क्लब ऑफ पुणे मगरपट्टा सिटी (आरसीपीएमसी) च्या नवीन रोटरीचा स्थापना सोहळा झाला. कोव्हिड १९ मुऴे हा सोहळा व्हर्च्युअल पद्धत्तीने साजरा करण्यात आला. यावेळी डॉ. कुलदीप चरक यांनी सुनिल हरपाळे यांच्याकडून अध्यक्षपद स्वीकारले, तर रवी मिश्रा यांना मनोज राजोळ यांच्या हस्ते क्लबचे सचिव म्हणून कार्यभार सोपवण्यात आला. याप्रसंगी जिल्हा गव्हर्नर इलेक्‍ट आरटीएन रश्मी कुलकर्णी आणि पीडीजी आरटीएन मोहन पलेशा उपस्थित होते.

नोबेल हॉस्पिटलच्या सहकार्याने, त्यांच्या कौशल्य आणि सुविधांसह, ‘गुडघ्याच्या वर’ अपंगांना मदत करण्यासाठी आणखी एक वैद्यकीय प्रकल्प हाती घेण्यात येत आहे. प्रयोग व सुविधांव्यतरिक्त , मास्क डोनेशन, पेडलवर चालित सॅनिटायझर स्टेशन यासारख्या सध्याच्या काळात जरूर सेवा आरसीपीएमसीच्या योगदानाचा एक भाग आहे. आरसीपीएमसीने विशेषत: वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण आणि सामाजिक कल्याणकारी प्रकल्प राबवले आहेत. त्यांनी 250 हून अधिक लाभार्थींच्या आणि कुटुंबियांच्या चेहऱ्यावर हस्य फुलवले आले.

डीजीई रश्मी कुलकर्णी यांनी आरसीपीएमसीच्या कार्याला प्रोत्साहन दिले आणि आगामी काळातही त्यांचे हे चांगले कार्य सुरूच राहील हा विश्वास व्यक्त केला.