Rotomac पेन बनवणाऱ्या कंपनीने लावला बँकांना ७५० कोटींचा चुना

मुंबई: पोलीसनामा ऑनलाईन – कानपूरस्थित रोटोमॅक ग्लोबल (Rotomac) आणि तिच्या संचालकांविरुद्ध आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केंद्रीय तपास यंत्रणा सीबीआयने (CBI) बुधवारी 16 नोव्हेंबर रोजी इंडियन ओव्हरसीज बँकेच्या (Indian Overseas Bank) सांगण्यावर हा दाखव करण्यात आला आहे. एकूण ७५०. ५४ कोटी रुपयेच्या फसवणुकीचा गुन्हा रोटोमॅक कंपनीवर (Rotomac) करण्यात आला आहे.

रोटोमॅक ग्लोबल (Rotomac) ही देशातील अग्रगण्य पेन उत्पादक (Pen Manufacturers) कंपनी आहे. या कंपनीकडे बँक ऑफ इंडियाच्या (Bank Of India) नेतृत्वाखालील बँकांच्या समूहाचे सुमारे 2,919 कोटी रुपये थकीत आहेत. या थकबाकीमध्ये 23 टक्के हिस्सा इंडियन ओव्हरसीज बँकेचा (IOB) आहे. सीबीआयने कंपनी, तिचे संचालक साधना कोठारी आणि राहुल कोठारी यांच्याविरुद्ध आयपीसीच्या कलम 120-बी आणि 420 अनुवये फसवणुकीचा (Financial Fraud) गुन्हा दाखल केला आहे. या व्यतिरिक्त भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या विविध तरतुदींनुसारचा ही समावेश केला आहे.

कंपनीने बँकेची फसवणूक केली आणि पैशांची हेराफेरीही केल्याचे बँकेने म्हटले आहे.
यामुळे कंपनीने चुकीच्या पद्धतीने 750.54 कोटी रुपयांचा लाभ मिळवला आणि बँकेला आर्थिक नुकसान झाले.
या रकमेची वसूली होऊ शकत नसल्याचंही बँकेने म्हटलेय. बँकेने २०१२ साली कंपनीला ५०० रूपयांचे नॉन फंड बेस्ड
क्रेडिट लिमिट दिले होते. याची थकबाकी २०१६ साली ७५०. ५४ कोटी रुपये झाली.
त्यानंतर खाते नॉन परफॉर्मिंग ऍसेट जाहीर करण्यात आले.

Web Title :- Rotomac | cbi books rotomac global its directors for rs 750 crore alleged fraud in indian overseas bank officials crime fraud

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Shraddha Walkar Murder Case | ‘या’ अँपवर झाली होती श्रद्धा आणि आफताबची ओळख; आता म्हणाले घटनेबद्दल ऐकून धक्का बसला

Janhvi Kapoor | जान्हवी कपूरने सोडली सगळी लाज, कॅमेऱ्यात कैद झाले ‘या’ अवस्थेतील फोटो