पाथरीत पोलिसांचा रूट मार्च

पाथरी : पोलीसनामा ऑनलाईन – गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी 11 सप्टेंबर रोजी साडेचारच्या सुमारास शहरातून वरिष्ठ अधिकारी प्रकाश एकबोटे पोलीस निरीक्षक डी.डी. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा रूट मार्च काढण्यात आला.

यावेळी राज्य राखीव दलाच्या दंगा नियंत्रण पथक तुकडीला पाचारण करण्यात आले. तसेच वरिष्ठ पोलीस अधिकारी व मोठ्या संख्येने पोलीस जवान व कर्मचारी यांनी काढण्यात आलेल्या लॉग रूट मार्चमध्ये सहभाग घेतला.

लॉंग रूट मार्च पोलीस ठाणे येथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या समोरुन चौक बाजार पाथरी पर्यंत पोहोचला तसेच शहरातील अन्यत्र भागात हा रूट मार्च घेण्यात आला.

गणेश विसर्जनाच्या वेळी अनुचित प्रकार घडू नये व कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी हा पोलीस लाॅंग रूट मार्च काढण्यात आला या काढण्यात आलेल्या पोलीस लॉंग रुट मार्चमध्ये उपविभागीय पोलिस अधिकारी प्रकाश एकबोटे पाथरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डीडी शिंदे सह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

 

Loading...
You might also like