Royal Enfield चे CEO विनोद दसारी यांनी दिला राजीनामा, बी. गोविंदराजन बनले नवीन एग्झीक्यूटीव्ह डायरेक्टर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Royal Enfield | आयशर मोटर्स लिमिटेड (Eicher Motors Ltd) ने गुरुवारी मोठी घोषणा करत म्हटले की, ऑटोमोबाईल प्रमुख रॉयल एन्फील्ड (Royal Enfield) चे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) विनोद दसारी (Vinod Dasari) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. दसारी यांनी आयशर मोटर्स लिमिटेडच्या डायरेक्टर (पूर्णवेळ) पदाचा सुद्धा राजीनामा दिला आहे.

कंपनीने गुरुवारी जारी केलेल्या वक्तव्यात म्हटले की, रॉयल एन्फील्डचे सीईओम्हणून पद सोडण्याशिवाय, दसारी यांनी आयशर मोटर्सच्या बोर्डचे कार्यकारी संचालक (Executive Director) पदाचाही राजीनामा दिला आहे. हा राजीनामा 13 ऑगस्ट 2021 पासून प्रभावी होईल.

मिंटनुसार, बी. गोविंदराजन यांना रॉयल एन्फील्ड (पूर्णकालिन, अतिरिक्त संचालक) चे एग्झीक्यूटीव्ह डायरेक्टर (Executive Director) पदावर 18 ऑगस्टपासून पाच वर्षांच्या कालावधीसाठी नियुक्त केले गेले आहे. आयशर मोटर्सने ही माहिती दिली आहे.

गोविंदराजन जून 2011 मध्ये कंपनीसोबत आपल्या दुसर्‍या कार्यकाळासाठी वरिष्ठ उपाध्यक्ष-उद्योग, पदावर रॉयल एन्फील्डमध्ये सहभागी झाले होते.
मागील दशकात दरम्यान ते रॉयल एन्फील्डची उत्पादन क्षमता अनेक पटीने वाढवण्यात सक्रिय प्रकारे सहभागी होते.

आयशर मोटर्सने एप्रिल 2019 मध्ये विनोद दसरी यांना रॉयल एन्फील्ड युनिट सीईओ पदावर नियुक्त करण्याची माहिती दिली होती.
आयशर मोटर्स लिमिटेडने म्हटले होते की, रॉयल एन्फील्डला एक जागतिक ब्रँड म्हणून पुढे नेण्यासाठी विनोद दसारी कंपनीत सिद्धार्थ लाल यांच्याकडून कार्यभार सांभाळतील.

रॉयल एन्फील्डमध्ये येण्यापूर्वी दसारी अशोक लेलँडचे सीईओ आणि मॅनेजिंग डायरेक्टर होते.
ते 2011 पासून या पदावर होते. त्यांनी 2005 मध्ये सीईओ म्हणून अशोक लेलँडमध्ये सुरुवात केली होती.

 

Web Title : royal enfield ceo vinod dasari has resigned b govindarajan take charge as executive director says eicher motors

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

Thackeray Government | पालकांना मोठा दिलासा ! शालेय शिक्षण शुल्कामध्ये कपातीचा सरकारी आदेश जारी

OMG ! मुल रडत असल्याने त्रस्त महिलेनं उचललं भयंकर पाऊल, ओठांवर फेव्हिक्विक लावून चिकटवले तोंड

Assam-Mizoram Border Clash | मूळच्या पुण्याच्या IPS ऑफिसरची मृत्यूशी यशस्वी झुंज’, सीमा संघर्षात लागल्या होत्या गोळ्या