कमी किमतीत लॉन्च झाली Royal Enfield Classic 350 S, जाणून घ्या फीचर्स

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बाईक प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. गेल्या महिन्यात रॉयल एनफील्डने बुलेट ३५० (Bullet 350) आणि बुलेट ३५० ईएस (Bullet 350 ES) चे स्वस्त मॉडेल्स बाजारात आणल्यानंतर आता लोकप्रिय बाईक क्लासिक ३५० (Classic 350) चे नवीन मॉडेल बाजारात आणले आहे . रॉयल एनफील्ड क्लासिक ३५० एस (Royal Enfield Classic 350 S) असे या मॉडेलचे नाव आहे. बाजारात या नवीन बाईकची किंमत १.४५ लाख रुपये आहे. रॉयल एनफील्डची नवीन क्लासिक ३५० एस बाईक प्युअर ब्लॅक आणि मर्करी सिल्वर अशा दोन रंगांमध्ये उपलब्ध आहे.

हे आहेत बदल आणि फीचर्स :-

या नवीन बाईकची किंमत स्टॅंडर्ड क्लासिक ३५० पेक्षा कमी ९ हजार रुपये कमी आहे. किंमत कमी ठेवण्यासाठी कंपनीने त्यात सिंगल चॅनल एबीएस दिले आहे, तर स्टँडर्ड क्लासिक ३५० मध्ये ड्युअल-चॅनल एबीएस आहे. याशिवाय कॉस्ट कटिंगसाठी कंपनीने नवीन क्लासिक ३५० एस मध्ये बरेच बदल केले आहेत. किंमत कमी ठेवण्यासाठी, या बाईकमध्ये चाके आणि इंजिन ब्लॉक काळा रंगातच आहेत, तर स्टॅंडर्ड क्लासिक ३५० मध्ये याठिकाणी क्रोम फिनिश आहे.

इंजिनमध्ये कोणताही बदल नाही :-

नवीन क्लासिक ३५० एस मध्ये यांत्रिकदृष्ट्या कोणताही बदल केलेला नाही. यात ३४६ सीसी, एकल-सिलेंडर, एअर-कूल्ड इंजिन आहे. हे इंजिन १९.८ HP पॉवर आणि २८ Nm टॉर्क जनरेट करते.

नवीन क्लासिक ३५० एस सध्या केवळ तामिळनाडू आणि केरळमध्ये उपलब्ध आहे. हे देशभरात विक्री कधीपासून सुरू होईल, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. तथापि, कंपनीने आधीच सांगितले आहे की ते आपल्या बाईकचे परवडणारे प्रकार आणेल, जे अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचू शकेल. असा विश्वास आहे की लवकरच ही बाईक देशभरात उपलब्ध होईल.

आरोग्यविषयक वृत्त –

काकडीचे ‘हे’ १५ अद्भूत आरोग्यवर्धक लाभ, जाणून घ्या

अंडर आर्म्सचे केस काढण्यासाठी ‘रेजर’ वापरत असाल तर ‘हे’ जरूर वाचा

‘या’ सोप्या ६ उपायांनी काही मिनिटांत दूर होईल कानदुखी, जाणून घ्या

कोथिंबीरचे ‘हे’ ९ फायदे, अशाप्रकारे करा वापर

कोरफड लाभदायक आहेच, पण होऊ शकतात ‘हे’ ७ दुष्परिणामही, जाणून घ्या

‘सेक्स’बाबत तुम्हालाही पडत असतील ‘हे’ 10 प्रश्न तर जाणून घ्या त्यांची उत्तरे

पन्नाशीनंतरही तरुण राहण्यासाठी स्त्री-पुरुषांनी करावीत ‘ही’ १६ कामे

दररोज ‘सेक्स’ केल्यास सुधारतो शुक्राणूंचा दर्जा, करा ‘हे’ ७ घरगुती उपाय

तुम्ही जर प्रेग्नेंट असाल तर ‘या’ ८ गोष्टींची विशेष काळजी घ्या