रॉयल एनफील्ड प्रथमच भारताच्या बाहेर बनवतंय आपली बाईक, अर्जेंटीनामध्ये उभारणार प्लँट

नवी दिल्ली : दिग्गज ऑटोमोबाइल कंपनी रॉयल एनफील्ड भारताच्या बाहेर प्रथमच पाऊल ठेवणार आहे. कंपनीने बुधवारी घोषणा करून सांगितले की, ते ग्रुपो सिम्पासोबत भागीदारी करून अर्जेंटीनात मोटरसायलचा लोकल असेंब्ली प्लँट स्थापन करणार आहे.

सुरूवातीला अर्जेंटीना प्लँटमध्ये रॉयल एनफील्डची तीन मॉडल – हिमालयन, इंटरसेप्टर 650 आणि कॉन्टिनेंटल जरटी 650- असेंबल केले जाईल.

अर्जेंटीनात अगोदरच विकली जात आहे रॉयल एनफील्ड
रॉयल एनफील्डने मार्च, 2018 मध्ये अर्जेंटीनाच्या बाजारात प्रवेश केला होता. तेव्हा कंपनीने ग्रुपो सिम्पासोबत भागीदारी केली होती. ग्रुपो सिम्पा आता अर्जेंटीनात रॉयल एनफील्डची लोकल डिस्ट्रीब्यूटर आहे.

अर्जेंटीनात रॉयल एनफील्डचे पहिले स्टोअर ब्यूनस आयर्सच्या विसेन्ट लोपेजमध्ये उघडले होते. यानंतर हळुहळु रॉयल एनफील्डने विस्तार करून अर्जेंटीनामध्ये अनेक स्टोअर उघडले.

एकुण मिळून कंपनीची लॅटिन अमेरिकन देशांमध्ये 31 एक्सक्लुझिव्ह स्टोअर आणि 40 अन्य रिटेल टच पॉईंट आहेत.

प्रथमच देशाबाहेर असेंबल होणार
रॉयल एनफील्डच्या इतिहासात प्रथमच देशातील चेन्नईत बनवलेली बाईक फर्मच्या बाहेर असेंबल आणि प्रोड्यूस केली जाणार आहे. भारत 900पेक्षा जास्त डिलरशिपसोबत कंपनीसाठी मोठा बाजार आहे.

वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी योजना – सीईओ
घोषणेबाबत सांगताना रॉयल एनफील्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) विनोद के. दसारी यांनी म्हटले की, वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी आणि प्रॉफिटसाठी एक स्ट्रॅटजी म्हणून आशिया प्रशांत क्षेत्रात आणि दक्षिण अमेरिकेच्या विशिष्ट बाजारात लोकल असेंब्ली युनिटची स्थापना करण्याची योजना आहे.

अर्जेंटीनामध्ये ग्राहकांकडून चांगली प्रतिक्रिया
दसारी यांनी म्हटले, मागील काही वर्षांपासून कंपनीने आपले अंतरराष्ट्रीय अस्तित्व वाढवले आहे आणि आता त्यांचा रिटेल व्यवसाय सुमारे 60 देशांमध्ये आहे.

त्यांनी म्हटले की, अर्जेंटीनासह दक्षिण अमेरिकन देश कंपनीसाठी महत्वपूर्ण बाजार आहेत. अर्जेंटीनात कंपनीला ग्राहकांकडून चांगली प्रतिक्रिया मिळाली आहे.

सोबतच त्यांनी म्हटले, लॅटिन अमेरिकन देशांमध्ये कंपनीसाठी ब्राझील, अर्जेंटीना आणि कोलंबिया महत्वपूर्ण बाजार आहे.