Royal Enfield च्या पसंतीच्या बाईकला आता तुम्ही देऊ शकता मनासारखा ‘लूक’, घरबसल्या अशाप्रकारे करू शकता रंग-रूपाची निवड

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Royal Enfield आजसुद्धा सर्वात पसंतीची बाईक आहे. कंपनीने मार्केटमध्ये तिचे अनेक मॉडल लाँच केले आहेत. ज्यापैकी एक Royal Enfield Classic 350 आहे. याबाबत कंपनीने ग्राहकांसाठी अशी ऑफर सादर केली आहे, जी जाणून घेतली तर तुम्ही सुद्धा खुश व्हाल.

कंपनी ग्राहकांना Royal Enfield च्या कलरपासून अनेक पार्टच्या मॉडलपर्यंत त्यांच्यानुसार निवड करण्याची संधी देत आहे. म्हणजे ते आपल्या मनाप्रमाणे बाईकला एक नवीन लूक देऊ शकतात.
हे बदल कसे करता येतील, ते जाणून घेवूयात…

या स्टेपद्वारे मिळवू शकता मनासारखा लूक

सर्वप्रथम रॉयल इनफिल्डची वेबसाइट https://makeityours.royalenfield.com वर जा. नंतर राज्य आणि शहर निवडा. हे निवडल्यानंतर समोर रॉयल इनफिल्ड क्लासिकचे मॉडल दिसेल.
यामध्ये तुम्हाला अनेक प्रकारचे मॉडल आणि कलर दिसतील. नंतर तुम्ही फिगर नाऊ बटनवर क्लिक करा.

 

येथे अनेक ऑपशन खुले होतील. सोबतच बाईकची छायाचित्रे असतील. येथे तुम्हाला कलर, मिरर, व्हील वे, हेडलाइट निवडण्याची संधी मिळेल.
ही निवड करून तुम्ही मनासारखी बाईक निवडू शकता.
इंजिन गार्ड आणि संप गार्डचे सुद्धा येथे विविध मॉडल दिले आहेत, ज्याची निवड मनाप्रमाणे करता येईल.
येथे कन्फर्टसाठी सीट सुद्धा वेगळ्या मॉडलच्या दिल्या आहेत ज्यांची किंमत 1750 पासून 4500 पेक्षा जास्त आहे.
याशिवाय यामध्ये तुम्ही काही वेगळे लावू इच्छित असाल तर किंवा बदल करायचा असेल तर तुम्ही थेट कंपनीकडे संपर्क साधू शकता.

350 सेगमेंटमध्ये रॉयल इनफिल्डने अनेक बाईक लाँच केल्या आहेत. यामध्ये एक क्लासिक 350 च्या शिवाय हन्टर 350 आहे.
या बाईकमध्ये सर्वात वैशिष्ट्य हे आहे की, तुम्ही यामध्ये मनासारखे बदल करू शकता. बाईक्च्या बुकिंगनंतर सुमारे दोन महिन्यात बाईक ग्राहकाला मिळते.

 

Web Title : Royal Enfield | you can now give your favorite avtar to royal enfield favorite bike you can choose the look just like this sitting at home

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Anti Corruption | 30 हजाराची लाच घेताना पुण्यातील तलाठी अँटी करप्शनच्या जाळ्यात

Gold Price Today | सोने खरेदीदारांना लागली लॉटरी, 10 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत झाले स्वस्त, जाणून घ्या नवीन दर

Hinjewadi-Shivajinagar Metro | प्रतीक्षेत असलेल्या हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोला मिळाला ‘मुहूर्त’