कौतुकास्पद ! 3 महिन्यांच्या भुकेल्या मुलीसाठी ‘त्या’ रेल्वे पोलिसानं लावली जीवाची बाजी (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   कोरोना संसर्गाच्या लढाईत डॉक्टर्स, नर्स, पोलिस दल, सफाई कर्मचारी यांच्यासोबतच विविध क्षेत्रातले लोक व सामाजिक संस्था जीवाची पर्वा न करता आहोरात्र झटत आहे. त्यामुळे त्यांच्यावरती सर्व स्तरातून कौतुकांचा वर्षाव होत आहे. दरम्यान, सोशल मीडियावरती रेल्वे पोलिसाचा एक व्हिडीओ व्हायरल होत असून, त्या पोलिसाची तुलना जगातील वेगवान धावपटू उसेन बोल्टशी केली जात आहे.

केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडीओ ट्विट केला आहे. त्यामध्ये रेल्वे पोलिस दलातील कॉन्स्टेबल इंदर यादव यांची तुलना त्यांनी उसेन बोल्ट सोबत केली आहे. इंदर यादव हे भोपाळ रेल्वे स्टेशनवरती कार्यरत आहे. गोयल यांनी लिहलं की, एका हातात रायफल आणि दुसऱ्या हातात दूध… भारतीय रेल्वेच्या या पोलिसानं उसेन बोल्टला देखील माघे टाकले.”

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावरती एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यात भोपाळ रेल्वे स्टेशनवरून स्थलांतरित मजुरांना घेऊन रेल्वे जात होती. तितक्यात इंदर यादव हातामध्ये दुधाची पिशवी घेऊन पळताना व्हिडिओमध्ये दिसत आहे. यासाठी रेल्वे मंत्र्यांनी इंदर यादवला रोख बक्षीस देण्याचीही घोषणा केली.

साफिया हाश्मी व त्यांचा ४ महिन्यांचा मुलगा श्रमिक ट्रेननं कर्नाटकातून उत्तरप्रदेशातील गोरखपूरच्या दिशेने प्रवास करत होते. ती ट्रेन काही मिनिटांसाठी भोपाळ रेल्वे स्थानकावर थांबली होती. तेव्हा साफियानं पोलिसांकडे विनंती केली की, “मुलासाठी दूध आणू शकले नाही आणि त्यामुळे त्याला पाण्यात बिस्कीट बुडवून खायला घालता आहे.”

त्यावेळेस तिच्या मदतीला इंदिरा यादव धावून गेले. मात्र, ते दूध घेईपर्यंत ट्रेन सुरु झाली आणि त्यांनी वेगानं धाव घेत त्या आई पर्यंत दूध पोहच केलं. एका हातात रायफल आणि दुसऱ्या हातात दुधाची पिशवी घेऊन इंदर यादव यांची ती धाव सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.