देशातील ‘या’ बडया कंपनीनं कर्मचाऱ्यांना कायमचंच दिलं Work From Home !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – आरपीजी या कंपनीनं कामकाजाच्या धोरणात मोठा बदल करत आता आपल्या कर्मचाऱ्यांना कायमचंच वर्क फ्रॉम होम दिलं आहे. असा बदल करणारी आरपीजी ही देशातील पहिलीच कंपनी ठरली आहे. 4 बिलियन डॉलर मूल्य असलेल्या या ग्रुपचा टायर, आयटी, आरोग्य, ऊर्जा, पायाभूत सुविधा आणि प्लांटेशनमध्ये सहभाग आहे.

सेल्स विभागाचे कर्मचारी कायमस्वरूपी घरातूनच काम करतील असं धोरण आरपीजीनं तयार केलं आहे. ऑफिसला येणारे कर्मचारीही 50 टक्के काम हे घरातूनच करतील. तर विशेष परिस्थितीत हे काम 75 टक्क्यांपर्यंत वाढवलं जाऊ शकतं.

ज्या कर्मचाऱ्यांना ऑफिसला येणं आवश्यक हे त्यांना 2 आठवडे घरातून काम करण्याचं धोरण आखण्यात आलं आहे. तर विशेष परिस्थितीत या कर्मचाऱ्यांना 2-3 आठडेही ऑफिसला न येता काम करता येणार आहे. सध्या लॉकडाऊनमुळं संपूर्ण कर्मचारी वर्ग हा घरातून काम करणार करत आहे. त्यामुळं आता ग्रुपनं आपली कार्यालये बंद ठेवली आहेत.

नवीन आरपीजी रिमोट वर्किंग पॉलिसी ही 1 सप्टेंबरपासून लागू होत आहे. आरपीजीच्या जगभरातील कंपन्यांसाठी हे धोरण लागू होत आहे. कारखाने आणि प्लांटेशनमध्ये जे कर्मचारी मशीनवर काम करत नाहीत त्यांचाही या धोरणात समावेश करण्यात आला आहे.

आरपीजी इंटरप्रायजेसचे चेअरमन हर्ष गोयंका यांनी एका मुलाखतीत सांगितलं की, “पारंपरिक कामकाज पद्धतीला फाटा देत वर्कस्पेस आणि उत्पादकक्षमता केंद्रीत करणं हे नवं धोरण आहे. ज्या कर्माचाऱ्यांना मशीनसंबंधित काम नाही आणि तंत्रज्ञान सेवेत ग्राहकांशी संवाद साधावा लागत नाही ते कोरोनानंतरही हवं तिथून काम करू शकतात.”