home page top 1

मुख्यमंत्री ‘RPI’ चा, रामदास आठवलेंचा ‘फॉर्म्युला’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – लोकसभा निवडणुकीत भाजपा शिवसेना महायुतीने राज्यात विजय मिळवल्यानंतर महायुतीला आता विधानसभेचे वेध लागले आहेत. विधानसभा होण्याआगोदरच महायुतीमध्ये कोणाचा मुख्यमंत्री होणार यावर शित युद्ध सुरु झाले आहे. त्यातच आरपीआयने मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत उडी घेतली आहे. दोन दोन वर्षे भाजपा आणि शिवसेनेने वाटून घ्यावे आणि एक वर्ष आरपीआयला मुख्यमंत्रीपद द्यावे असा फॉर्मुला रामदास आठवले यांनी दिला आहे.

पुण्यातील एक जागा द्यावी
लोकसभा निवडणुकीत भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या रिपब्लिकन पक्षाला एकही जागा देण्यात आली नव्हती. लोकसभा निवडणुकीत भाजपाने बहुमत मिळवल्यानंतर आरपीआयचे रामदास आठवले यांना केंद्रात मंत्रीपद दिले. लोकसभेत जागा मिळाल्या नसल्या तरी रामदास आठवले यांनी विधानसभा निवडणुकीत दहा जागांची मागणी केली आहे. दहा जागांपैकी एक जागा पुण्यातली असली तर आनंद वाटेल असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे.

उगाच नाक खुपसू नका
भाजपा आणि शिवसेनेत मुख्यमंत्री आपलाच होणार यावरून वाद सुरु असताना जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्री भाजपाचा होईल असे म्हटले आहे. यावर प्रतिक्रीया देताना शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले युतीबाबत आमचं ठरलं, त्यामुळे त्यात कोणी नाक घालू नका अशी प्रतिक्रीया दिली. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमचे युती बाबत ठरले आहे. त्यामुळे इतर कोणी त्यात तोंड घालू नये असे उद्धव ठाकरे म्हणाले.

Loading...
You might also like