राज्यातील प्रार्थनास्थळे खुली करण्यासाठी आज ‘रिपब्लिकन’चे आंदोलन

पोलिसनामा ऑनलाईन टीम – कोरोनामुळे राज्यभरात मागील पाच महिन्यांपासून प्रवेशबंदी असलेली सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे भाविकांसाठी खुली करावीत, या मागणीसाठी आजपासून रिपब्लिकन पक्षाच्या वतीने मुंबईसह राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनमध्ये प्रार्थनास्थळे बंद करण्यात आली. मात्र आता लॉकडाउन शिथिलीकरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनतेत प्रबोधन झाले असल्यामुळे पुरेशी खबरदारी घेऊन सुरक्षेचे नियम पाळून सर्व धर्मयांची प्रार्थनास्थळे खुली करावीत, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली होती. त्यापार्श्वभूमीवर आज रिपब्लिकनकडून ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येणार आहे.