मतदानाच्या अवघ्या चार दिवसांआधीच महायुतीला धक्का,

ठाणे : पोलीसनामा ऑनलाईन – ठाण्यात महायुतीला मोठा धक्का  बसला आहे. चौथ्या टप्प्यातील मदतानाला केवळ चार दिवस उरलेले असताना महायुतीमध्ये फुट पडली असली असून वारंवार अपमान झाल्याच्या भावनेतून रिपाइंने महायुतीऐवजी महाआघाडीचे उमेदवार आनंद परांजपे यांना पाठींबा जाहीर केला आहे. रिपाइंचे ठाणे उपाध्यक्ष, संघटक तथा प्रवक्त्यांनी यासंदर्भात पत्रकार परिषद घेऊन घोषणा केली आहे.

वारंवार आम्हाला अपमानास्पद वागणूक मिळते, कोणत्याच बैठकास पत्रकार परिषदा, चौक सभा यांचं निमंत्रण दिले जात नाही. कुठेही रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले, जिल्हा प्रमुख रामभाऊ तायडे यांचे फोटो लावले जात नाही. भाषणात जयभीम देखील बोलले जात नाही. आम्हाला स्टेजवर मागे बसवून अपमान केला जातो. त्यामुळे ठाण्यात आम्ही शिवसेनेचे खासदार व महायुतीचे उमेदवार राजन विचारे यांच्या विरोधात आहोत, राष्ट्रवादीचे उमेदवार आनंद परांजपे यांना आमचा पाठिबा आहे. असे ठाणे रिपाइं चे प्रवक्ते विकास चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

रामदास आठवले आणि जिल्हाध्यक्षांशी बोलणं झालं तेव्हा आम्हाला असं न करण्यास सांगितले. मात्र आम्ही अपमान सहन करू शकत नाही. कारवाई झाली तरी चालले परंतु राजन विचारे यांना पाठींबा देणार नाही. असे ते म्हणाले.