RR Patil | ‘मृत्यू पप्पांना आधीच दिसला होता का?’ आबांच्या कन्येची भावनिक पोस्ट व्हायरल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  RR Patil | एकेकाळी गृहमंत्री (Maharashtra Home Minister) पदावर आपलं नाव कोरलेले आणि सर्वसामान्यांचा आवाज असणारे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री दिवंगत आर आर पाटील (आबा) (RR Patil) यांची आज देखील आठवण निघते. सांगली (Sangli) जिल्ह्यातील छोट्याशा खेड्यात आबांचा जन्म झाला. या खेड्यापासूनच त्यांनी आपली राजकीय कारकीर्द पक्की केली. आणि राज्याच्या विधानसभेत मजल मारली. फेब्रुवारी 2015 रोजी आबांचे आजारपणामुळे निधन झाले. 2014 च्या विधानसभा निवडणुकीती विजयी मिळवल्यानंतर आंबानी केलेला गावाचा शेवटचा दौरा आणि त्यांच्या अखेरच्या दिवसांसंदर्भात आर. आर. पाटील यांची कन्या स्मिता पाटील (Smita Patil)) यांनी केलेली एक भावूक पोस्ट व्हायरल होत आहे.

 

आबांची (RR Patil) कन्या स्मिता पाटील यांनी भावूक पोस्ट लिहिली आहे. ती म्हणजे, ‘पप्पांचा शेवटचा दिवस! आज 8 नोव्हेंबर. बरोबर 7 वर्षे झाली माझ्या वडिलांना आज घरातून शेवटचे बाहेर जाऊन..! आजच्या दिवशी 2014 मध्ये सकाळी 11 वाजता माझ्या वडिलांनी घर सोडले.
काही दिवस दिल्लीला विश्रांतीसाठी निघालोय, असे पप्पांनी माझ्या आजीला सांगितले होते.
3 नोव्हेंबरला नवीन विधानसभेच्या पहिल्याच अधिवेशनात पप्पांनी घणाघाती भाषण केले होते.
या भाषणाचे महाराष्ट्र विधानसभेने टाळ्यांच्या कडकडाटात अभिनंदन केले होते. त्यानंतर 6 नोव्हेंबरला पप्पा अंजनीला घरी आले.
हेलिकॉप्टरमधून सगळं गाव त्यांनी दोन-दोनदा फिरून पाहिले. घरातून बाहेर जाताना पप्पा नेहमी उपस्थित सर्व लोकांना अभिवादन करत असत.
त्याचप्रमाणे खिडकीतून सर्व कुटुंबीयांकडे पाहून जात असत. पण त्यादिवशी मात्र पप्पा जाताना लोकांमधून वेळ काढून मी आणि माझी बहिण सुप्रिया हिला भेटण्यासाठी आमच्या रूममध्ये आले.

तर, पप्पांनी (RR Patil) त्यादिवशी वर येऊन आम्हा दोघा बहिणींना घट्ट मिठी मारली. त्याक्षणी त्यांच्या डोळ्यात पाणी आले होते.
आम्ही दोघी बहिणीही विचार करू लागलो की, पप्पांना काय वाटले असावे, की पप्पांनी मिठ्ठी मारली आणि पप्पांच्या डोळ्यात का पाणी आले असावे?
पण आम्हाला वाटलेही नव्हते की, आज पप्पांनी आम्हाला शेवट चे कुशीत घेतले आहे, अशी आठवण स्मिता पाटील यांनी केली आहे.

 

दरम्यान, पुढे त्या म्हणाल्या की, त्या दिवशी पप्पांनी गावच्या मारुती-शंकराचेही न चुकता दर्शन घेतले होते.
स्वतःच्या गावात चावडीसमोर निवडून आल्याबददल सत्कार स्वीकारताना पप्पा म्हणाले होते की, स्वतःच्या गावाकडून हा माझा शेवटचा सत्कार ठरावा!
आता आणखी किती सत्कार करणार? कदाचित मृत्यू पप्पांना आधीच दिसला होता का? असा एक भावूक सवालही स्मिता पाटील यांनी आपल्या पोस्टमधून केला आहे.

 

Web Title : RR Patil | Did pappa see death already emotional post of r r patils daughter smita r r patil goes viral on social media

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Solapur Crime | डोक्यात घाव घालून पत्नी आणि मुलीचा निर्घृण खून, सोलापूरच्या करमाळा तालुक्यात प्रचंड खळबळ

PV Sindhu ने ’Love Nwantinti’ गाण्यावर केला जबरदस्त डान्स, वायरल झाला Video

Mumbai Cruise Drugs Case | मुंबई पोलिसांच्या एसआयटी चौकशीत मोठा खुलासा; जाणून घ्या ड्रग्स प्रकरणात कशी झाली वसुली? ‘त्या’ सेल्फीमुळं पर्दाफाश