१० वी पास असणार्‍यांसाठी नोकरीची सुवर्णसंधी ; रेल्वेत ९९२ पदांची मेगा भरती, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या बेरोजगारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. रेल्वेतील पदांसाठी ते अर्ज करू शकतात. भारतीय रेल्वेची इंटिग्रल कोच फॅक्ट्री प्रशिक्षणार्थी पदासाठी ९९२ जागांची भरती निघाली आहे. या पदांसाठी १० वी किंवा ITI पास व्यक्ती या पदासाठी अर्ज करू शकतात. अर्जाची शेवटची तारीख जवळ आहे. इच्छुक लोक २४ जूनपर्यंत अर्ज करू शकतात. यासंबंधी आवश्यक माहिती खाली देण्यात येत आहे.

पदाचे नाव – प्रशिक्षणार्थी

एकूण पदांची संख्या – ९९२

पात्रता – १० वी किंवा ITI पास व्यक्ती

वयाची अट – उमेदवाराचे वय कमीतकमी वय १५ वर्ष आणि जास्तीतजास्त वय २४ वर्ष असले पाहिजे. वयाची मोजणी १.१०.२०१९ पासून मोजली जाईल.

स्टाइपेंड

फ्रैशर साठी
पहिल्या वर्षी – ५७०० प्रति महिना
दुसऱ्या वर्षी – ६५०० प्रति महिना

आयटीआय उमेदवारांसाठी

पहिल्या वर्षी – ५७००
दुसऱ्या वर्षी – ६५००
तिसऱ्या वर्षी – ७३५०

अर्जाची फी

सामान्य/ईडब्ल्यूएस/ओबीसी वर्गासाठी – १०० रुपये
एससी/एसटी/पीडब्ल्यूडी यांसाठी अर्जाची फी नाही.

या आधारावर होणार निवड

उमेदवाराची निवड १० वीला मिळालेल्या गुणांवर आणि मुलाखतीवर केली जाईल.

येथे करा अर्ज

इच्छुक विद्यार्थ्यांनी ऑफिशियल वेबसाइट icf.indianrailways.gov.in यावर अर्ज करू शकतात.


सिने जगत –

काय सांगता ! फेसबुकवर ‘बिकीनी’ फोटो टाकल्याने ‘या’ महिला डॉक्टरचे ‘लायसन्स’ रद्द !

बर्थडे स्पेशल : ‘या’ प्रसिद्ध गायिकेने सोशल मिडियावर ‘न्यूड’ होण्याची दिली होती ‘धमकी’

Video : जान्हवी कपूरचा ‘हा’ Belly डान्स पाहून यूजर्संनी दिला ‘सल्‍ला’, बघता-बघता व्हिडीओ ‘व्हायरल’

आरोग्यविषयक वृत्त

बेलाच्या पानात लपलय लोकसंख्या रोखण्याचं ‘गुपित’, ‘कॅन्सर’ आणि ‘लिव्हर’साठी देखील फायदाच

#YogaDay2019 : नियमित योगा करा…आणि स्मरणशक्ती वाढवा

केस पांढरे असतील तर आहारात करा ‘हा’ बदल

तृतीयपंथींसाठी रूग्णालयात स्वतंत्र कक्ष हवा : गौरी सावंत

राज्यात ‘MBBS’च्या जागा वाढणार