रेल्वेत 10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची ‘सुवर्ण’संधी ! जाणून घ्या प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी रेल्वेत नोकरीची संधी आहे. रेल्वेने भरती प्रकिया राबवली आहे. ही भरती रेल्वे भरती सेल (RRC) कडून काढण्यात आली आहे. उत्तर रेल्वेत मल्टी टास्किंग स्टाफसाठी 118 पदांवर भरती राबवण्यात येणार आहे. तर पश्चिम रेल्वेमध्ये ज्यूनियर इंजिनिअर आणि डिपो सामग्री अधीक्षकच्या 149 जागांवर भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. यासाठी इच्छूक उमेदवार 15 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्ज दाखल करु शकतात.

रेल्वेत मल्टी टास्किंग स्टाफ पदासाठी 118 जागा –
Northern Railway मध्ये मल्टी टास्किंग स्टाफसाठी 118 पदांवर भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. 15 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्ज दाखल करु शकतात. उमेदवार 10 वी पास असणे आवश्यक आहे. वयोमर्यादा 18 ते 33 वर्ष असणे आवश्यक असेल. उमेदवारांची निवड लेखी परिक्षेच्या आधारे करण्यात येईल.

149 पदांसाठी भरती –
आरआरसीने ज्यूनियर इंजिनिअर आणि डिपो सामग्री अधीक्षक या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली आहे. या पदांवर एकूण 149 जागा भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 ऑक्टोबर असेल. या पदांसाठी इंजिनिअरिंग झालेले उमेदवार अर्ज करु शकतात.

येथे करा अर्ज –
अर्ज करणाऱ्या उमेदवाराने www.rrc-wr.com या वेबसाइटवर आपला अर्ज भरावा. संबंधित भरतीची माहिती या वेबसाईटवर उमेदवारांसाठी उपलब्ध आहे.

visit : Policenama.com