10 वी पास उमेदवारांसाठी रेल्वेत नोकरीची ‘सुवर्ण’संधी ! 4103 जागांसाठी भरती, जाणून घ्या प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रेल्वेमध्ये भरती प्रक्रिया जोमाने राबवली जात असताना दिसत आहे. लाखोच्या संख्येने उमेदवार सरकारी नोकरीसाठी अर्ज करत आहे. तुम्ही देखील सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी रेल्वे भरती ही सुवर्ण संधी आहे. कारण रेल्वे भरतीत एकूण 4,103 पदांवर भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या पदांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार आजपासून अर्ज करु शकतात.

वयोमर्यादा – या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय किमान 15 वर्ष तर जास्तीत जास्त 24 वर्ष असणं आवश्यक आहे.

शैक्षणिक योग्यता – विशेष म्हणजे या पदांसाठी 10 वी पास उमेदवार देखील अर्ज करु शकतात. तसेच विविध पदांसाठीच्या योग्यतेसंबंधित माहिती नोटिफिकेशनमधमध्ये देण्यात आली आहे.

पदांची संख्या –
पदांचे नाव – अ‍ॅपरेंटिस
पद संख्या – 4103

महत्वाच्या तारखा –
अर्ज करण्याची प्रारंभाची तारीख – 9 नोव्हेंबर 2019
अर्ज करण्याची अंतिम तारीख – 8 डिसेंबर 2019 (रात्री 23.20 वाजेपर्यंत)

अर्जाचे शुल्क – एससी, एसटी, महिला, पीडब्ल्यूडी उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे शुल्क नाही.
बाकी उमेदवारांना 100 रुपये अर्जाचे शुल्क असेल.

निवड प्रक्रिया – उमेदवारांची निवड मेरिट लिस्टच्या आधारे करण्यात येईल.

अर्जाची प्रक्रिया –
उमेदवारांना आपले अर्ज वेळेत भरावे लागतील. सर्व माहिती वाचूनच अर्जदारांनी अर्ज ऑनलाइन भरावा. उमेदवार या पदांसाठी https://scr.indianrailways.gov.in/ या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 8 डिसेंबर 2019 असणार आहे.

Visit : Policenama.com