रेल्वेत 10वी आणि 12वी पास उमेदवारांना नोकरीची ‘सुवर्ण’संधी, जाणून घ्या प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दक्षिण मध्य रेल्वेने पुन्हा अनेक पदे भरण्यासाठी अर्ज मागविले आहेत. ही भरती स्काउट आणि गाइड्स कोट्यातंर्गत विविध पदांवर केली जात आहे. या पदांवर अर्ज करण्यासाठी ऑफलाइन अर्ज देखील करता येतात.

पदांचे नाव : स्काउट आणि गाइड्स कोटा अंतर्गत विविध पदे

पदांची संख्या : १०

शैक्षणिक पात्रता
उमेदवारांची किमान पात्रता मान्यताप्राप्त संस्थेतून दहावी व बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच कोणत्याही व्यापार आयटीआय प्रमाणपत्र किंवा राष्ट्रीय अप्रेंटसशिप प्रमाणपत्र असणेही अनिवार्य आहे.

वय मर्यादा
उमेदवारांचे किमान वय १८ वर्षे आणि कमाल वय ३० वर्षे निश्चित केले गेले आहे.

महत्त्वाच्या तारखा
अर्ज सबमिट करण्यासाठी प्रारंभ तारीख : २१ डिसेंबर २०२०

अर्ज भरण्याची शेवटची तारीख : २० जानेवारी २०२०

अर्ज प्रक्रिया
या पदांसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिसूचना वाचणे आवश्यक आहे. सर्व माहिती प्राप्त झाल्यानंतर अर्जाची प्रक्रिया पूर्ण करा. कोणतीही चूक झाल्यास, अर्ज स्वीकारला जाणार नाही.

निवड प्रक्रिया
लेखी परीक्षा, स्काउटिंग स्कील असेस्मेंट आणि कागदपत्र पडताळणीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/