रेल्वेमध्ये 1104 जागांसाठी ‘मेगा’भरती, 10 वी पास उमेदवारांसाठी ‘सुवर्ण’संधी, जाणून घ्या प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रेल्वे भरती सेल (आरआरसी) उत्तर पूर्व रेल्वे (एनईआर) ने अपरेंटिस अधिनियम, 1961 नुसार अप्रेंटिसशिप (इंटर्नशिप) साठीच्या भरतीबाबत सूचना दिल्या आहेत. रेल्वेमध्ये 1,104 पदांसाठी भरती केली जाणार आहे. उत्तर पूर्वेकडील रेल्वेमध्ये अपरेंटिस भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी www.ner.indianrailways.gov.in या वेबसाइटवरून जाऊन अधिकृत माहिती मिळवावी.

पदांची वर्गवारी पदांची संख्या
मेकॅनिकल वर्कशॉप गोरखपुर – 411
सिग्नल वर्कशॉप गोरखपुर कैंट – 63
ब्रिज वर्कशॉप गोरखपुर कैंट – 35
मेकॅनिकल वर्कशॉप इज्जत नगर – 151
डीजल शेड इज्जत नगर – 60
कैरेज आणि वैगन इज्जत नगर – 64
कैरेज आणि वैगन लखनऊ जंक्शन 155
डीजल शेड गोंडा – 90
कैरेज आणि वैगन वाराणसी – 75

महत्वाची तारीख
ऑनलाइन अर्ज भरण्याची अंतिम तारीख 25 डिसेंबर 2019 सायं 05:00 वाजेपर्यंत अर्ज करू शकता.

शैक्षणिक पात्रता
उमेदवार 10वीं / हाई स्कूल (SCVT / NCVT द्वारे मान्यता प्राप्त ) 50 % गुणवत्तेनुसार पास झालेला असला पाहिजे. त्यासोबतच त्याच्याकडे आयटीआयचे सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे.

वयोमर्यादा
उमेदवारासाठी कमीत कमी वयोमर्यादा 15 वर्ष आणि जास्तीत जास्त 24 वर्ष ठरवण्यात आली आहे.

निवड प्रक्रिया
दहावी पास असलेल्या उमेदवारांची निवड त्यांच्या योग्यतेनुसार केली जाईल.

कसा करणार अर्ज
दिलेल्या तारखेआधी किंवा त्याच दिवशी उमेदवार ऑनलाइन अर्जाची पूर्तता करू शकतात. यासाठी ner.indianrailways.gov.in वेबसाईट तपास.

परीक्षा फी
उमेदवाराला यासाठी 100 / – रुपये फी भरावी लागणार आहे.

Visit : policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like