मनोरंजनमुंबई

RRR Movie Craze | रामचरण आणि ज्यूनियर एनटीआरच्या चाहत्यांनी भर रस्तात केली गर्दी, UK मध्ये चाहत्यांनी नारळाच्या पाण्यानं पोस्टरवर केला अभिषेक..

पोलीसनामा ऑनलाईन टीम – अखेर प्रेक्षकांची उत्सुकता संपली असून बहुचर्चित चित्रपट ‘आर आर आर (RRR Movie Craze)’ चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटामध्ये रामचरण (Ram Charan), ज्यूनियर एनटीआर (Junior NTR), अभिनेता अजय देवगन (Ajay Devgan) आणि अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आपल्याला दिसणार आहे. चित्रपटासाठी अनेक चाहते आतुर झाले होते. प्रेक्षकांना या चित्रपटाची इतकी ओढ लागली होती की, 60 करोड रुपयांहून अधिक रक्कम एडवान्स बुकिंगने कमावली (RRR Movie Craze).

 

 

‘आर आर आर (RRR)’ या चित्रपटाचं वेड केवळ भारतातच नव्हे, तर विदेशात सुद्धा पसरलं आहे. विदेशातील राम चरण आणि ज्यूनियर एनटीआर यांच्या चाहत्यांचा एक व्हिडिओ (RRR Movie) सोशल मीडियावर आला आहे. या व्हिडिओनं सर्वत्र इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. यूके (UK – RRR Movie) मधील ज्यूनियर एनटीआरच्या चाहत्यांनी चक्क त्याचा पोस्टरवर नारळाच्या पाण्यानं अभिषेक केला आहे. तर काही चाहते चित्रपटातील गाणे लावून, डीजेवर नाचत आहे (RRR Movie Craze).

 

 

दरम्यान, या चित्रपटानं संगीत, डिस्ट्रीब्यूशन असे राईट्स विकून प्रदर्शनाआधी 800 कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटानं यूएस (USA) प्रीमियरमध्ये 16 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. एका मी़डियाच्या बातमीनुसार, ‘आर आर आर’ नं प्री बुकिंगनेच आत्तापर्यंतचे सगळे रेकॉर्ड तोडले आहे. देशाव्यतरिक्त इतर भागांमध्ये देखील आगऊ बुकिंगला सुरूवात झाली आहे.

 

Web Title :- RRR Movie Craze | crowds of ramcharan and jr ntr fans came on the streets fans in uk anointed them with coconut water

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Back to top button