RRR Movie | RRR या चित्रपटाने सर्वोत्तम चित्रपटाचा सन्मान जरी हुकला तरी ‘नाटू नाटू’ने गोल्डन ग्लोब पुरस्कार पटकावत रचला इतिहास

पोलीसनामा ऑनलाइन : RRR Movie | दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांच्या ‘RRR’ या चित्रपटाने सर्वांनाच वेड लावले होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. देश विदेशात या चित्रपटाची सर्वत्र चर्चा होती. पुन्हा एकदा या चित्रपटासाठी सर्वात मोठी बातमी आहे. ती म्हणजे RRR चित्रपटातील ‘नाटू नाटू’ या गाण्याने गोल्डन ग्लोब पुरस्कार पटकावत इतिहास रचला आहे. भारतातील हा पहिलाच चित्रपट असेल ज्याला गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाला आहे. सर्वोत्तम बिगर इंग्रजी चित्रपट पुरस्काराने मात्र RRR ला हुकवणी दिली तरीही नाटू नाटू या गाण्याने गोल्डन ग्लोब पुरस्कार पटकावल्याने सगळीकडेच आनंदाचे वातावरण दिसत आहे. टेलर स्विफ्ट, रिहाना, लेडी गागा यासारखे दिग्गजांची गाणी स्पर्धेत असताना सर्वोत्तम चित्रपट संगीत या प्रकारात RRR ने बाजी मारल्याने सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. (RRR Movie )
RRR या चित्रपटाला दोन नामांकने मिळाली होती. त्यातील सर्वोत्तम बिगर इंग्रजी प्रकारात अर्जेंटिनामध्ये बनवलेल्या ‘अर्जेंटिना 1985’ या चित्रपटाने RRR वर मात केली. मात्र तरीही नाटू नाटू या गाण्याने गोल्डन ग्लोब पुरस्कार पटकावला आहे. नुकताच हॉलीवुड फॉरेन प्रेस असोसिएशनने आयोजित केलेल्या गोल्डन ग्लोब पुरस्कार पार पडला.
यामध्ये कालभैरव आणि राहुल सिप्लिगुंज यांच्या आवाजातील तर ज्येष्ठ संगीतकार एम. एम. कीरावानी यांनी संगीतबद्ध केलेल्या नाटू नाटू या गाण्याला पुरस्कार मिळाल्याची घोषणा जेना ओर्टेगा हिने व्यासपीठावर करताच RRR च्या टीम मध्ये एकच जल्लोष दिसला. (RRR Movie )
हा पुरस्कार पटकावण्याची ही पहिलीच वेळ असल्याने सर्वत्र आरआरआरच्या टीमवर शुभेच्छांचा वर्षा होताना
दिसतात आहे. एवढेच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील आरआरआरने पटकवलेल्या पुरस्काराचा
सर्व भारतीयांना अभिमान आहे आणि ही खूप मोठी कामगिरी असल्याचे म्हणत टीमच्या सदस्यांचे अभिनंदन केले.
तर अभिनेते अमिताभ बच्चन, शाहरुख खान, चिरंजीवी, प्रभास यांनी देखील राजामौली आणि चित्रपटाच्या
टीमचे भरभरून कौतुक करत ट्विटद्वारे अभिनंदन केले आहे.
Web Title :- RRR Movie | golden globe for rrr movie song natu natu award amy
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update