मनोरंजनमुंबई

RRR OTT Release Date | ‘या’ दिवशी ओटीटीवर रिलिज होणार राजामौलीचा ’आरआरआर’, लक्षात ठेवा तारीख

नवी दिल्ली : वृत्त संस्था – RRR OTT Release Date | एस.एस. राजामौली (SS Rajamouli) यांचा चित्रपट RRR बॉक्स ऑफिसवर वर्चस्व राखून आहे RRR Box Office Collection). या चित्रपटाने जगभरात 800 कोटींहून अधिकचा व्यवसाय केला आहे. ज्युनियर एन.टी.आर., रामचरण, आलिया भट्ट आणि अजय देवगण स्टारर या सिनेमाची लोकांमध्ये अशी क्रेझ आहे की दुसर्‍या आठवड्यातही सिनेमागृहे हाऊसफुल्ल आहेत. (RRR OTT Release Date)

ज्यांना सिनेमा मोठ्या पडद्यावर पाहता आला नाही. ते OTT वर रिलीज होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.
अशा प्रेक्षकांची इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे.

लवकरच ’आरआरआर’ एक नव्हे तर दोन ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. हा चित्रपट Zee5 वर प्रादेशिक भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरआरआर तेलुगु, तमिळ, मल्याळम आणि कन्नडमध्ये Zee5 वर पाहता येईल.

रिलीजच्या दोन महिन्यांनंतर, चित्रपट Zee5 वर येईल म्हणजेच चित्रपट OTT वर 25 मे रोजी हिंदी वगळता सर्व भाषांमध्ये प्रदर्शित होईल. आरआरआर सध्या ओटीटी वर हिंदीमध्ये रिलीज होणार नाही.

आरआरआरच्या निर्मात्यांनी देखील अल्लू अर्जुनच्या ’पुष्पा – द राइज’ च्या धर्तीवर लवकर ओटीटी वर रिलीज न करण्याचा निर्णय घेतला आहे. हा चित्रपट हिंदी पट्ट्यात चांगली कमाई करत असून, लवकरच 200 कोटींचा आकडा पार करणार आहे. अशा स्थितीत निर्माते इतक्या लवकर ओटीटीवर रिलीज करण्याचा धोका पत्करण्याच्या मनस्थितीत दिसत नाहीत.

आरआरआरचे हिंदी व्हर्जन नेटफ्लिक्सवर रिलीज होऊ शकते.
तसेच सांगण्यात येत आहे की, हा चित्रपट रिलीजच्या जवळपास
3 महिन्यांनंतर म्हणजेच 25 जूनपर्यंत ओटीटीवर रिलीज होऊ शकतो.
आरआरआरचे व्हीएफएक्स खूप पसंतीला उतरत आहेत.
या चित्रपटाने रिलीज झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड मोडले आहेत.

Web Title : RRR OTT Release Date | rrr ott release date rajamouli s ram charan
jr ntr alia bhatt ajay devgn starrer rrr release on zee5 and netflix on this date

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Bharti Singh Good News | सुप्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंहच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन, दिला गोंडस बाळाला जन्म..!

 

Retired DySP Dilip Shinde Passes Away | निवृत्त पोलीस उप अधीक्षक दिलीप शिंदे यांचे पुण्यात निधन

 

Neetu Singh Kapoor Viral Dance Video | वयाच्या 63 व्या वर्षी नितू कपूरनं दिली चक्क नोरा फतेहीला टक्कर,
डान्स पाहून तुम्हीही होताल थक्क !

Back to top button