RRR चित्रपटाने फडकावला अटकेपार झेंडा, सर्वश्रेष्ठ आंतरराष्ट्रीय चित्रपटासाठी मिळाला ‘हा’ पुरस्कार

पोलीसनामा ऑनलाईन – RRR| भारतीय चित्रपटांचे चाहते आज संपूर्ण जगभरात पसरले आहेत. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, युरोप याप्रमाणेच जपान, चीन यासारख्या देशात भारतीय चित्रपट (Indian Movies) हे आवडीने पाहिले जातात. एसएस राजामौली (SS Rajamouli) यांचा ‘RRR’ या चित्रपटाने कमाल करत अटकेपार झेंडा फडकावला आहे. या चित्रपटाला ऑस्कर (Oscar) इतक्याच एका प्रतिष्ठित पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे.
एसएस राजामौली, राम चरण (Ram Charan) आणि ज्युनियर एनटीआर (Junior NTR) हे चित्रपटाच्या प्रदर्शनानिमित्त जपानला (Japan) गेले होते. या दोन्ही स्टार्सचे जपानमध्ये जंगी स्वागत करण्यात आले होते. गेल्या शुक्रवारी जपानच्या चित्रपटगृहात RRR हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. हा चित्रपट जपानमध्ये पहिल्या दिवशी सर्वात जास्त कमाई करणारा भारतीय चित्रपट ठरला आहे. याबरोबरच या चित्रपटाला 25 ऑक्टोबर रोजी सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपटाचा ‘सॅटर्न पुरस्कार’(Saturn Award) ही घोषित केला आहे.
या पुरस्कार सोहळ्यात वेगवेगळ्या चित्रपटांचा समावेश करण्यात आला होता. यामध्ये ‘एफिल’,
‘राइडर्स ऑफ जस्टिस’, ‘साइलेंट नाइट’यासारख्या चित्रपटांना मागे टाकत ‘RRR’ने यात बाजी मारली आहे.
या पुरस्कार सोहळ्यात केवळ चित्रपटच नव्हे तर वेगवेगळ्या वेबसीरिजचासुद्धा (Webseries) समावेश होता.
या चित्रपटाने हिंदीत तब्बल 274 कोटीपेक्षा जास्त कमाई केली आहे, तर जगभरात या चित्रपटाने 1100 कोटींचा आकडा पार केला आहे.
Web Title :- RRR | ss rajamauli rrr wins saturn awards 2022 for best internation film
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
T20 World Cup | पाकिस्तानचे भवितव्य आता भारताच्या हातात, नेमके काय आहे वर्ल्डकपचे समीकरण