IPL 2020 : राहुल तेवतियाच्या ‘तुफानी’नं युवराजला घाबरवलं होतं, जाणून घ्या का म्हणाला ‘थॅक्यू’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – शारजाह क्रिकेट स्टेडियमवर रविवारी रात्री धावांचा इतका पाऊस झाला की, आयपीएलचा विक्रम झाला. पहिल्या फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या किंग्ज इलेव्हन पंजाबच्या संघाने २२३/२ धावा केल्यानंतर विचारही केला नसेल कि पुढच्या काही तासांत त्यांना पराभवाचा सामना करावा लागेल.

शारजाहच्या छोट्या मैदानावर ज्याची भीती होती तेच घडले. फलंदाजांनी छोट्या बाऊंड्रीचा जोरदार वापर केला आणि षटकारांचा वर्षाव केला. २७ वर्षाच्या राहुल तेवतियाला राजस्थान रॉयल्सचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने काही विचार करूनच चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवले होते. थोडाच वेळ का होईना, पण जेव्हा त्यांनी त्यांची वृत्ती दाखवायला सुरुवात केली, तेव्हा किंग्ज इलेव्हन पंजाबल धक्का बसला.

शेवटच्या तीन ओव्हरमध्ये ५१ धावा आवश्यक होत्या. ‘हरियाणा हरिकेन’ तेवतिया २३ चेंडूंत १७ धावा देत खेळत होता आणि येथूनच त्याने बाजी पलटली. तेवतियाने शेल्डन कॉट्रेलच्या डावाच्या १८ व्या ओव्हरमध्ये वादळ निर्माण केले. त्याने ५ षटकार (६,६,६,६,०,६) ठोकत संपूर्ण समीकरण बदलले.

सामना पाहणारा माजी क्रिकेटपटू युवराज सिंगही तेवतियाच्या या खेळीने अवाक् झाला. तेवतियाने सलग चार चेंडूत चार षटकार ठोकले होते. आता पाचव्या चेंडूची बारी होती… पण या चेंडूवर तेवतिया चुकला. म्हणूनच युवराजने ट्वीट करून लिहिले की, ‘मिस्टर राहुल तेवतिया… ना भाई ना! एक चेंडू चूकवल्याबद्दल तुझा धन्यवाद. वास्तविक त्याला १३ वर्ष जुन्या सहा षटकारांचा विक्रम आठवला होता.

युवराज सिंगने २००७ मध्ये दक्षिण आफ्रिकेत खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-२० विश्वचषकात इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडच्या एका ओव्हरमध्ये सर्व ६ चेंडूत ६ षटकार ठोकले होते. आतापर्यंत क्रिकेटविश्वात अनेकदा हा पराक्रम पाहायला मिळाला आहे. तेवतियाने एक चेंडू चुकवला नसता, तर तोही या यादीमध्ये सामील झाला असता.

राहुल तेवतिया (३१ चेंडूत ५३ धावा, ७ षटकार) एका ओव्हरमध्ये पाच षटकारांसह राजस्थान रॉयल्सने किंग्ज इलेव्हन पंजाबला ४ विकेट्सने पराभूत करून आयपीएलमध्ये सर्वात मोठे लक्ष्य मिळवण्याचा त्यांचा १२ वर्ष जुना विक्रम मोडला.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like