अधिकाऱ्यांचा गजब कारभार : तब्बल एक कोटींच्या वस्तू आदिवासीयांना न देता ठेवल्या गोदामात 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सरकार आदिवासी विध्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी कोट्यवधी रुपयांच्या योजना जाहीर करतात. मात्र जाहीर केलेल्या योजनां आदिवासी विध्यार्थ्यांन पर्यंत पोहंचतात की नाही. त्या योजनांची अंमलबजावणी गंभीरपणे  होते का हा प्रश्न नेहमी उपस्थित होतो. आता मात्र चंद्रपूरमधील एका आश्रम शाळेच्या गोदामात सहा वर्षांपासून  तब्बल  एक कोटींच्या वस्तू पडून असल्याची माहिती समोर आली आहे.
चंद्रपूर येथील बोर्डा आश्रम शाळेच्या गोदामात आदिवासी विध्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या ११४ सायकल, दूध वितरणासाठी २२ मोटरसायकल, शिलाई मशीन, ब्लँकेट्स असा तब्बल एक कोटीं पर्यंतच्या वस्तू आढळल्या आहेत.
विशेष म्हणजे राज्य सरकारच्या आदिवासी कल्याण समितीच्या पाहणीत ही बाब समोर आली आहे. इतकेच नव्हे तर काँग्रेस आमदार आणि समितीचे सदस्य संतोष टारफे यांनी हा मोठा घोटाळा असण्याची शक्यता व्यक्त केली आहे. याचबरोबर  राज्यात इतर ठिकाणी आदिवासी विद्यार्थ्यांसाठी असलेल्या वस्तू वापराविना पडून असल्याची शंकाही त्यांनी उपस्थित केली आहे.
आमदार टारफे यांनी आदिवासी विभागाच्या मुख्य सचिवांना  या प्रकरणाची चौकशी करावी आणि संबंधितांवर गुन्हा नोंदवण्याची मागणी पत्राद्वारे केली आहे. इतकेच नव्हे तर आगामी हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित करणार असल्याचेही त्यांनी म्हंटले आहे. दरम्यान, या प्रकाराची गंभीर दखल घेण्यात आली असून अतंर्गत चौकशी सुरू झाली असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.