पब्लिक प्रॉव्हिडंट फंडात २०० रुपये गुंतवा अन् मिळवा ३४ लाख

नवी दिल्ली :

पैसे बचतीसाठी आता सरकारने ‘पब्लिक प्रॉव्हिडंट फंड’ची अनोखी योजना आणली आहे. त्यासाठी दररोज तुम्हाला २०० रुपये वाचवून या योजनेत पैसे गुंतवावे लागतील. २० वर्षांनंतर गुंतवलेल्या २०० रुपयांचे ३४ लाख रुपये होतील . या योजनेत गुंतवणुकीसाठी पब्लिक प्रॉव्हिडंट फंडचं खातं उघडावं लागणार आहे.ज्या लोकांना महिन्याच्या बजेटमधून पैशांची बचत करणं अवघड जातं, त्यांच्यासाठी पब्लिक प्रॉव्हिडंट फंड हा चांगला पर्याय आहे.

असे तयार होतील ३४ लाख 

दररोज या योजनेत २०० रुपये गुंतवल्यानंतर महिन्याभरात ६,००० रुपये गुंतवणूक होते. अशा प्रकारे तुमचे वर्षाला ७२,००० रुपये बचत होतात. असे १५ वर्षं पैसे गुंतवल्यास खात्यात १०,८०,००० रुपये जमा होतील. तसेच या योजनेत ५ वर्षांची वाढ करण्याची सुविधा आहे. असं केल्यास २० वर्षांत खात्यात जवळपास १०,४०,०००,रुपये जमा होणार आहेत. पीपीएफमध्ये ७. ६ टक्के व्याज मिळतं. २० वर्षांपर्यंत व्याजाचा दर कायम राहिल्यास ३३. ९२ लाख रुपयांचा परतावा मिळतो. या योजनेत जवळपास १९.५२ लाख रुपयांचं निव्वळ व्याज मिळते.

जाहिरात

पीपीएफ योजनेंतर्गत गुंतवलेल्या पैशांची तुम्हाला हमी मिळते. या योजनेतून मिळणा-या परताव्याच्या फायद्यावर कोणताही टॅक्स लावला जात नाही. तसेच यात नॉमिनीचीही व्यवस्था करण्यात आली आहे. विशेष म्हणजे पीपीएफ अकाऊंट पोस्ट ऑफिस आणि बँकांच्या निवडक शाखेतही उघडता येते. याची मर्यादा १५ वर्षांपर्यंत असून, ते ५ वर्षांसाठी वाढवता येते.

[amazon_link asins=’B01CZJH85I,B077XXRDJM’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’b4eca893-b1dc-11e8-b29f-2dfbcd0deed5′]