एटीएम फोडून २२ लाखांची रोकड लंपास 

अहमदनगर :पोलिसनामा ऑनलाईन

संगमनेर येथील मालदाड रस्ता व नाशिक-पुणे रस्त्यावरील ऑरेंज कॉर्नरचे एटीएम अज्ञात चोरट्यांनी फोडून पोबारा केला. चोरट्यांनी दोन्ही एटीएम फोडून सुमारे २२ लाख रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना बुधवारी मध्यरात्री २ वाजण्याच्या दरम्यान घडली. पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरु केला आहे.

मालदाड रस्त्यावरील कॅनरा बँकेचे तर ऑरेंज कॉर्नर येथील भारतीय स्टेट बँकेचे एटीएम फोडण्यात आले. अज्ञात चोरट्यांनी गॅस कटरच्या साहाय्याने एटीएम फोडून रक्कम पळवली. यामध्ये स्टेट बँकेच्या एटीएममधून १९ लाख ४२ हजार ३०० रुपये आणि मालदाड रस्त्यावरील कॅनरा बँकेच्या एटीएममधून २ लाख ६५ हजार असे एकूण २२ लाख रुपये चोरट्यांनी चोरून नेले.
[amazon_link asins=’B076H74F8N’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’10992c88-966f-11e8-88f5-5914560bc0b4′]

श्वानपथक व ठसे तज्‍ज्ञांना पाचारण करण्यात आल्यानंतर पुढील तपासास सुरवात झाली आहे. पोलिसांसमोर चोरट्यांना पकडण्याचे मोठे आव्हान असणार आहे. दरम्यान, ऑरेंज कॉर्नर येथील स्टेट बँकेचे  एटीएम सेंटर ८ महिन्यांपूर्वी अज्ञात चोरट्यांनी फोडून नेले होते, आद्यापपर्यंत त्याचा शोध घेता आलेला नाही.