अबब ! पाकिस्तानातील अपघातग्रस्त विमानाच्या ढिगार्‍यात मिळाले 30 दशलक्ष रुपये, तपास सुरू

इस्लामाबाद : वृत्त संस्था – पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्स च्या दुर्घटनाग्रस्त झालेल्या विमानातील ढिगार्‍यात चक्क ३० दशलक्ष रुपये मिळून आले आहेत. त्यामुळे सर्वच जण चक्रावून गेले आहेत.
लाहोरहून कराचीला जाणार्‍या एअरबेस याच्या विमानाने जिन्ना आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन उड्डाण केल्यानंतर काही वेळात निवासी भागात कोसळले होते. गेल्या शुक्रवारी झालेल्या या अपघातात ९७ जणांचा मृत्यु झाला होता. यामध्ये केवळ दोघे जण बचावले आहेत.

या अपघाताची चौकशी सुरु आहे. या विमानाच्या जळालेला ढिगारा उपसल्यानंतर त्यामध्ये दोन बॅगा आढळून आल्या. त्यात विविध देशातील चलनी नोटा आढळून आल्या असून त्यांची किंमती जवळपास ३०दशलक्ष रुपये इतकी आहे. इतकी मोठी रक्कम विमानात नेताना ही कोणाला कशी आढळून आली नाही. सामान स्कॅनर करणार्‍यांच्या हे लक्षात कसे आले नाही याची चौकशी करण्यात येणार आहे.

अपघाताची चौकशी करणार्‍या परदेशी ११ सदस्यांच्या विशेष पथकाने गुरुवारी या अपघातस्थळाला भेट देऊन तेथून कॉकपिट वॉईस रेकॉर्डर शोधून काढला. त्यात एअरबस या कंपनीचे प्रतिनिधींचाही समावेश होता. या कॉकपिट वॉईस रेकॉर्डरमधील संभाषणावरुन अपघातामागील नेमकी कारणे शोधून काढण्यात येणार आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like