आता रस्ते अपघातात मृत्यू झाल्यास ५ लाख अन् गंभीर जखमीला मिळणार २.५ लाख !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आता रस्ते अपघातात मृत्यू झालेल्या त्यांच्या कुटूंबियांना ५ लाख रुपयांपर्यंत मदत मिळणार आहे. तसे विधेयक केंद्र सरकारने आणले आहे. मोटार व्हेईकल विधेयक (संशोधन) २०१९ हे विधेयक केंद्र सरकारने लोकसभेत मांडले आहे. तसेच रस्ते अपघातात गंभीर जखमी झालेल्यांना २.५ लाख रुपये मदत म्हणून देण्याचा प्रस्ताव यात ठेवण्यात आला आहे.

मृत आणि जखमी व्यक्तीला मदत
लोकसभेत लिखित उत्तर देताना रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले की या विधेयकात मोटर वाहनाच्या उपयोगात झालेल्या कोणत्याही अपघातात मृत्यू झाल्यास पीडिताच्या कुटूंबाला मदत म्हणून ५ लाख रुपये देण्याचे प्रस्ताव ठेवण्यात आला. तसेच गंभीर जखमी झालेल्या प्रकरणात व्यक्तीला २.५ लाख रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेण्यात आल आहे. मोटार व्हेईकल विधेयक २०१९ ला काही दिवसांपूर्वी मंजुरी दिली होती. यानंतर हे विधेयक लोकसभेत मांडले आहे.

रस्ते सुरक्षाचे हे कडक नियम
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले की, या विधेयकात लायसन्स व्यवस्था आधिक कठोर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास दंडात वाढ करण्यात आली आहे. वाहनांच्या देखभालीची तपासणी, दोषपूर्ण वाहनांचा परत मागवणे. रस्त्यांवर रस्ते सुरक्षा लागू करणे यांच्या समावेश करण्यात आला आहे. या प्रस्तावात बस आणि कॅब एग्रिगेटर्सचा कसा फायदा होईल यांचा देखील विचार करण्यात आला आहे.

इलेक्ट्रिक वाहनांच्या नोंदणीवर नाही द्यावे लागणार शुल्क
त्यांनी सांगितले, देशात इलेक्ट्रिक वाहनांना प्रोस्ताहन देण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीवर नोंदणी शुल्कातून सूट देण्यात आली आहे. तसेच सरकारने हे केंद्रीय मोटर व्हेईकल नियम १९८९ मध्ये संशोधन करुन वाहन चालकांसाठी असलेले कमीतकमी शिक्षण ही अट देखील काढून टाकण्यात येणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त

दात पांढरेशुभ्र हवे असतील तर लिंबाचा असा करा उपयोग

पावसाळ्यात आलू बुखार आवश्य खा, यात आहेत भरपूर ‘व्हिटामिन्स’

अपचनाची समस्या अशी दूर करा, हे आहेत प्रभावी ६ घरगुती उपाय

डोकेदुखीने त्रस्त आहात का ? हे घरगुती रामबाण उपाय करा

‘मक्याचं’ कणीस खाल्यावर लगेच पाणी पिणे पडेल ‘महागात’

‘या’ ५ कारणांमुळे होते ‘किडनी’ खराब, जाणून घ्या

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like