विनाकारण फिरणाऱ्या कडून 50 हजार रुपये दंड, जेजुरी पोलिसांची कारवाई

पुरंदर : पोलीसनामा ऑनलाइन  – महाराष्ट्र शासनाने ब्रेक द चैन या योजनेअंतर्गत लॉकडाउन जाहीर केलेले आहे.सदर लॉकडाऊनला १५ मे पर्यंत मुदतवाढ दिली आहे. शनिवार व रविवार विकेंड लॉककडाउन असते.या दोन दिवसांमध्ये फक्त अपरिहार्य कारणास्तव बाहेर पडावे अशी अपेक्षा नियम म्हणताना आहे. परंतु नागरिक याकडे सर्रास दुर्लक्ष करून बाहेर पडत आहेत.

त्यामुळे त्यांच्यावर नियमाने कारवाई करण्यासाठी पुरंदर तालुक्यातील जेजुरी पोलिस ठाणे आणि निरा जेजुरी मोरगाव चौक,माळशिरस, मोरगाव रोड या ठिकाणी वेगवेगळ्या टीम करून नाका बंदी लावण्यात आली. नाकाबंदी मध्ये ई पास असणारे लोक व अपवादात्मक परिस्थितील लोकांना सोडण्यात येत होते. परंतु बहुतांशी लोक काहीतरी दवाखान्यात चाललो भेटायला चाललो जीवनावश्यक वस्तू आणायला चाललो असे सांगत होते.

या सर्व लोकांची कसून तपासणी करण्यात आली. एकूण जेजुरी पोलीस ठाणे अडीचशे लोकांच्या वर दुपारी तीन वाजेपर्यंत कारवाई केली व एकूण ५० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच लग्नामध्ये प्रमाणापेक्षा जास्त गर्दी केलेली दोन केसेस करण्यात आल्या. वाहतुकीच्या वीस केसेस करण्यात आल्या यापुढे रविवारी सुद्धा ही कारवाई सुरू राहील.असे जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी सांगितले.