काय सांगता ! होय, घरबसल्या शेअरमधून कमावले 1584 कोटी

पोलिसनामा ऑनलाईन टीम – सोन्याच्या किंमतीमध्ये रेकॉर्ड स्तरावरील किमतीची नोंद झाल्यानंतर काल टायटन कंपनीच्या शेअर्सच्या किमतीमध्ये 4 टक्क्यांनी वाढ झाली आहेे. त्यामुळे घरबसल्या कंपनीच्या मालकाने तब्बल 1584 कोटी कमाविले आहेत.

लॉकडाऊनमुळे सोन्याच्या किंमतीत रेकॉर्ड तेजी पाहायला मिळत आहे. गुंतवणूकदारांकडून सोन्याची मागणी वाढली आहे. भारतातील दिगग्ज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांची टायटनच्या स्टॉक्सना पसंती असते. टायटनच्या स्टॉकचा भाव 4.4 टक्क्यांनी वाढून 1089.10 रुपये प्रति शेअरवर पोहोचला होता. 24 मार्च रोजी या स्टॉकचा भाव 720 रुपयांपर्यंत खाली आला होता. यावर्षी टायटनच्या शेअर्समध्ये 9 टक्क्यांची घसरण झाली आहे.

मात्र गेल्या 1 महिन्यात 8 टक्क्यांची वाढ देखील झाली आहे. जूनच्या तिमाहीपर्यंत राकेश झुनझुनवाला आणि त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला यांच्याकडे टायटनचे 4.90 कोटी शेअर्स होेते. जेव्हा मार्चमध्ये टायटनचे शेअर्स सर्वात कमी स्तरावर होते, तेव्हा या दाम्पत्याने 3,528 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. शुक्रवारी शेजर बाजार बंद होताना ही किंमत 5,112 कोटींवर पोहोचली आहे. याचा अर्थ या दाम्पत्याला 1584 कोटींचा फायदा झाला आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like