‘डिजीटल’ झालं ‘RSS’, मोहन भागवत यांच्यासह अनेक मोठ्या नेत्यांची ट्विटरवर ‘एन्ट्री’
पोलीसनामा ऑनलाइन टीम : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी सोमवारी सकाळी सोशन मिडीयाच्या जगात ‘एन्ट्री’ केली आहे. मोहन भागवत यांनी ट्विटरवर ‘एन्ट्री’ केल्यानंतर त्यांनी ट्विट केले नाही. मात्र, त्यांच्या ‘एन्ट्री’ची चर्चा ट्विटरवर होत आहे. मोहन भागवत यांचे ट्विटर अकाऊंट @DrMohanBhagwat या नावाने आहे.
केवळ मोहन भागवतच नाही तर आरएसएसच्या इतर मोठया नेत्यांनी देखील ट्विटरवर ‘एन्ट्री’ केली आहे. त्यामध्ये सह-सरकार्यवाह सुरेश सोनी, कृष्ण गोपाल, अरूण कुमार, अनिरूध्द देशपांडे यांचा समावेश आहे. या सर्वांनी सोमवारी सकाळी ट्विटरवर ‘एन्ट्री’ केली आहे. मात्र, त्यापैकी कोणीही अद्याप ट्विटरवर ट्विट केलेले नाही.
मोहन भागवत यांची सोशल मिडीयावर ‘एन्ट्री’
यापुर्वी आरएसएसचे ट्विटरवर अकाऊंट होते. मात्र, त्या अकाऊंटवरून संघ केवळ मोठया नेत्यांचे म्हणणे तसेच मोहन भागवत यांचे ‘स्टेटमेंट’ शेअर करत होते. गेल्या काही दिवसांपासुन RSSकडून सर्वसामान्य जनतेशी थेट संबंध जोडण्यावर भर दिला जात असून त्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. गतवर्षी मोहन भागवत यांनी दिल्ली येथील विज्ञान भवन येथील कार्यक्रमात भाषण केले होते. त्यानंतर संघाने देशातील विविध वर्गातील लोकांसोबत 3 दिवस थेट चर्चा केली होती. विज्ञान भवन येथे झालेल्या कार्यक्रमात मोहन भागवत यांनी लोकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली तसेच संघाचा विचार, रणनिती आणि भविष्यातील विचाराबाबत सांगितले होते. केवळ चर्चा आणि संवाद नव्हे तर संघाने त्यांच्या प्रतिमेच्या विपरीत काही कामे करून सर्वांनाच आर्श्चयाचा धक्का दिला आहे. त्यामध्ये माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना कार्यक्रमासाठी बोलविल्याचा समावेश आहे. काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांना चर्चेसाठी निमंत्रण देणे तसेच उद्योगपती रतन टाटा यांच्यासोबत चर्चा केल्यामुळे सर्वांनाच आर्श्चयाचा धक्का बसला होता.
अहो आश्चर्यम ! ‘वजन’ कमी करण्यासाठी रात्री फक्त ‘हे’ करा
‘या’ व्यसनांमुळे बिघडते तुमचे ‘आरोग्य’, या व्यसनांपासून कायम राहा दूर
व्यायाम केल्यास ‘मधुमेहात’ होऊ शकते सुधारणा
‘स्मरणशक्ती’ वाढविण्यासाठी हे रामबाण उपाय आवश्य करा
शाकाहारीं नो, पौष्टिकतेवर लक्ष द्या ; प्रोटिनयुक्त पदार्थ शरीराला आवश्यक
शारीरीक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी संगीत चिकित्सा ठरते उपयोगी