‘राष्ट्रवाद’ शब्दामध्ये ‘हिटलर’ची ‘झलक’, हिंदुत्वाच्या अजेंड्यावर काम करणार RSS : मोहन भागवत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी राष्ट्रवादाच्या मुद्यावर मोठे विधान केले आहे. मोहन भागवत म्हणतात की, राष्ट्रवाद सारखा शब्द नाझी आणि हिटलरची झलक दर्शवितो. झारखंडची राजधानी रांची येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी एका कार्यक्रमाला संबोधित करताना म्हणाले कि, आरएसएसचा विस्तार हा देशासाठी आहे कारण आमचे ध्येय भारताला जागतिक गुरु बनविणे आहे.

‘राष्ट्रवाद हा शब्द वापरण्यास टाळा’
आरएसएस प्रमुख मोहन भागवत म्हणाले की, राष्ट्रवादासारखा शब्द वापरु नये. कारण याचा अर्थ नाझी किंवा हिटलरमधून निघू शकतो. अशा परिस्थितीत राष्ट्र किंवा राष्ट्रीय यासारखे शब्द ठळकपणे वापरायला हवे. ते म्हणाले की, इसिस, कट्टरतावाद आणि हवामान बदल यासारख्या समस्या सध्या जगासमोर एक मोठे आव्हान आहे. जगासमोर असलेल्या मोठ्या समस्यांपासून केवळ भारतच सुटका मिळवून देऊ शकतो, अशा परिस्थितीत भारताने जगाचे नेतृत्व करण्याचा विचार केला पाहिजे. देशाची एकता ही खरी ताकद आहे, त्याचा आधार वेगळा असू शकतो परंतु उद्देश एकच आहे.

आरएसएस हिंदुत्वाच्या अजेंड्यावर पुढे जाईल :
हिंदुत्वाच्या मुद्दय़ावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख म्हणाले की, हिंदू हा एकच शब्द आहे जो भारत जगासमोर योग्यप्रकारे सादर करतो. देशात अनेक धर्म असूनही, प्रत्येक व्यक्ती हिंदू अशा शब्दाशी संबंधित आहे. हा शब्द स्वतः देशाची संस्कृती जगासमोर दर्शवितो. ते म्हणाले की, देशाच्या विस्ताराबरोबरच संघ हिंदुत्वाच्या अजेंडावर पुढे जात राहील जो देशाला जोडण्यासाठी काम करेल. संघ प्रमुख म्हणाले की, आपण सर्वांनी माणुसकीने जगायला शिकले पाहिजे, यासाठी देशावर प्रेम करणे आवश्यक आहे. संघात आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना याबद्दल ज्ञान देतो.