दिल्ली हिंसाचारावर RSS प्रमुख मोहन भागवत यांचं ‘मोठं’ विधान (व्हिडीओ)

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – दिल्लीमध्ये सीएएवरून सुरु असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी मोठं विधान केले आहे. आपल्या देशात काहीही घडलं तरी त्याला आपणंच जबाबदार आहोत. काही राहून गेलं किंवा काही वर खाली झालं तरी आता ब्रिटीशांना दोष देऊ शकत नाही. जेव्हा आपण गुलामगिरीत होतो, तेव्हा जे काही होत होतं ते आता चालणार नाही. नागरिक अनुशासन आणि सामाजिक अनुशासनाची सवय अशाच कार्यक्रमामधून होते, असे भागवत यांनी म्हटलं आहे.

मोहन भागवत हे नागपूरमध्ये सुरु असलेल्या नववर्ष 2020 कार्यक्रमात बोलत होते. सामाजिक अनुशासनावर जोर देत भागवत म्हणाले आता आपण स्वतंत्र झालो आहोत. आज आपल्या देशात आपलं राज्य आहे. राज्याचं स्वातंत्र्य टिकून रहावे आणि राज्य सुरळीतपणे सुरु रहावे यासाठी सामाजिक आणि नागरिक अनुशासन अत्यंत आवश्यक असल्याचे मोहन भागवत यांनी यावेळी सांगितले.

भगिनी निवेदिता यांचा उल्लेख करताना मोहन भागवत म्हणाले, स्वातंत्र्यापूर्वी भगिनी निवेदिता यांनी आपल्या सर्वांना सतर्क केले होते. त्यांच्या म्हणण्यानुसार देशभक्तीची दैनंदिन जीवनातील अभिव्यक्ती नागरिकत्व अनुशासनाचे पाक करण्याची असते. आपल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख करताना त्यांनी म्हटले की, संविधान सादर करताना आंबेडकर यांनी संसदेत दोन भाषणे केली होती. या भाषणांमध्ये त्यांनी ज्या बाबींचा उल्लेख केला होता ती हीच बाब आहे. मोहन भागवत पुढे म्हणाले, आपल्या देशात आता जे काही होईल त्याला आपणच जबाबदार असू यासाठी आपण कोणताही निर्णय घेण्यापूर्वी बराच विचार करायला पाहिजे असे भागवत यांनी म्हटले आहे.