Narendra Modi | BJP चा मोठा निर्णय ! राज्यांतील विधानसभा निवडणुकामध्ये आता पीएम मोदींचा चेहरा वापरण बंद

पोलीसनामा ऑनलाइन टीम – पुढील वर्षी उत्तर प्रदेशासह 5 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका (elections) होणार आहेत. या निवडणुकासांठी भाजपने आतापासून तयारी सुरु केली आहे. विशेष म्हणजे यात आरएसएसने देखील लक्ष घातले आहे. उत्तर प्रदेशची निवडणूक मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्त्वाखाली लढवण्याचा निर्णय दिल्लीत झालेल्या बैठकीत घेतला आहे. विशेष म्हणजे उत्तर प्रदेशसोबत निवडणूक होत असलेल्या इतर राज्यांमध्येही भाजप मोदींचा चेहरा वापरणार नाही. सुत्रांच्या माहितीनुसार, संघाला मोदींच्या प्रतिमेची काळजी आहे. त्यामुळेच राज्यांच्या निवडणुका मोदींच्या चेहऱ्यावर लढवल्या जाऊ नये असे संघाला वाटत आहे. तसेच उत्तर प्रदेशात भाजपने मोदीच्या चेहरा वापरल्यास काँग्रेस आणि समाजवादी पक्ष बंगालमधील राजकारणाची पुनरावृत्ती करतील, असा धोका संघाला वाटतो.

दिल्लीत झालेल्या बैठकीला सरसंघचालक मोहन भागवत आणि सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे उपस्थित होते.
यावेळी महत्वाचे निर्णय घेण्यात आले.
प्रादेशिक नेत्यांच्या विरोधात पंतप्रधान मोदींचा चेहरा पुढे केल्याने त्यांच्या प्रतिमेला धक्का पोहोचत असल्याचे संघाला वाटत आहे.
राज्याच्या निवडणुकीत elections प्रादेशिक नेते विरुध्द मोदी असे चित्र उभे केल्याने विरोधकांकडून मोदींना लक्ष्य केले जात असल्याचे निरीक्षण बैठकीत नोंदविण्यात आले आहे.
बैठकीत पश्चिम बंगालमधील भाजपच्या पराभवाबद्दल चिंतन करण्यात आले.
बंगालमध्ये पंतप्रधान मोदी वि. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी अशी रणनीती आखल्याने नुकसान झाल्याचा नष्कर्ष काढण्यात आला.
बंगालमध्ये भाजपचा पराभव तर झालाच, त्यासोबतच विरोधकांना पंतप्रधान मोदींवर शाब्दिक हल्ले करण्याची संधी मिळाली.
त्याचा मोठा परिणाम मोदींच्या प्रतिमेवर झाल्याचे संघाला वाटत आहे.

यापूर्वी बिहार अन् दिल्लीतही भाजपने मोदीच्या चेहऱ्यावर निवडणुका elections लढवल्या.
2015 मध्ये बिहारमध्ये नितीश कुमार यांच्याविरोधात आणि दिल्ली विधानसभेत अरविंद केजरीवालांविरोधात भाजपने मोदींचा चेहरा वापरला होता.
मात्र या दोन्ही ठिकाणी भाजपला मोठा फटका बसला आहे बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि काँग्रेसने मोदींची मुस्लिमविरोधी प्रतिमा तयार केली.
त्यामुळे मुस्लिमांची एकगठ्ठा मत तृणमूल काँग्रेसला मिळाली.
बंगालप्रमाणेच उत्तर प्रदेशातही मुस्लिमांचे प्रमाण मोठे आहे.
विधानसभेच्या 75 जागांवर मुस्लिम मतदार थेट परिणाम करू शकतात.
त्यामुळे उत्तर प्रदेशात मोदीचा चेहरा वापरल्यास मोठा फटका बसण्याची भिती संघाला वाटत आहे.

Petrol-Diesel Price Today : विक्रमी पातळीवर पोहचले पेट्रोल-डिझेल, मुंबईत 102 रुपये लीटरच्या जवळ, जाणून घ्या पुण्यासह इतर शहरातील दर

COVID-19 Vaccination | देशभरात 21 जूनपासून मोफत दिली जाणार कोरोनाची लस, जाणून घ्या तुमच्या मनातील सर्व प्रश्नाची उत्तरे

Wab Title : rss decides not use pm narendra modi face assembly elections