संघ परिवारालाही बसू लागली महागाईची झळ

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन 

इंधनदरवाढ आणि अन्य कारणामुळे वाढत चाललेल्या महागाईने सध्या सर्वसामान्य जनता त्रस्त आहे. अशाही परिस्थितीत भाजप समर्थक सरकारची बाजू घेत असल्याने नागरिकांमधील संताप अधिकच वाढत चालला आहे. मात्र, आता सर्व सामान्य जनतेला बसत असलेली महागाई झळ संघ परिवारालाही बसत असल्याचे दिसून येत आहे. भाजप सरकार सत्तेत आल्यापासून गॅस सिलिंडरच्या किंमतीत वाढ झाली आहे. तसेच इंधनाचे दरही दिवसेंदिवस वाढत असल्याने चक्क राष्ट्रीय स्वंयसेवक संघ परिवारातील संघटनाही नाराज आहेत. या दरवाढ विरोधात संघ परिवारातील अखिल भारतीय ग्राहक पंचायत आता ठराव मांडणार आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’86ecfa1c-ca03-11e8-8f93-919cacca6b94′]

मागील काही महिन्यात सिलिंडरच्या किंमतीत सतत वाढ होत आहे. सध्या सिलिंडर हजार रुपयांच्या जवळपास पोहोचला आहे. धक्कादायक म्हणजे मागील सात महिन्यात सिलिंडरच्या किंमतीत २३१ रुपयांनी वाढ झाली आहे. तसेच पेट्रोल-डिझेलचे दर सातत्याने वाढत आहेत. महागाईची झळ सोसणाऱ्या ग्राहकांच्या संतापाचा भडका उडाला आहे. या वाढत्या महागाईमुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारातील संघटनाही सरकारवर नाराज आहेत.

[amazon_link asins=’B07DKNBSV2,B077TQDPVH’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’b45cbffa-ca03-11e8-878e-572615ca25f1′]

त्यामुळेच संघ परिवारातील अखिल भारतीय ग्राहक पंचायत सरकारविरोधात ठराव मांडणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे संघाच्या रेशीमबागेतील सभागृहात होणाऱ्या परिषदेत सरकारविरोधात हा ठराव मांडला जाणार आहे. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. त्यामुळेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारातील संघटनाही उघडपणे सरकार विरोधात आपली नाराजी व्यक्त करत आहे. नागपुरातील संघाच्या स्मृतीभवन परिसरात शनिवारपासून राष्ट्रीय परिषदेला सुरुवात झाली आहे. या परिषदेत वाढत्या महागाईमुळे ग्राहक पंचायत सरकारविरोधात ठराव मांडणार आहे.

PUNE : व्यापाऱ्याचे अपहरण करुन २० कोटींची खंडणी मागणाऱ्या तिघांना अटक

पेट्रोल तीनशे रूपये झाले तरी मोदींनाच मत देणार, काँग्रेसच्या राज्यातही पेट्रोल दरवाढ होत होती, अशी इंधनदरवाढीवर सरकारची बाजू घेणाऱ्या भाजप समर्थकांमुळे नागरिकांमधील नाराजी अधिकच वाढत चालली आहे. मात्र, आता सर्वसामान्यांच्या बाजूने संघ परिवारातीलच संघटनाच उतरल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.