पुन्हा एकदा ‘निशाणा’, ही तर संजय राऊतांची ‘बौध्दिक’ दिवाळखोरी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेना आपल्या मुख्यपत्र सामनातून भाजपवर बाण मारत असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचाराच्या तरुण भारत या वृत्तपत्राने देखील सामना संपादक संजय राऊत यांच्यावर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. राजकीय पक्षाचा प्रवक्ता म्हणून नागपूरातून 93 वर्षाची परंपरा लाभलेला तरुण भारत हे वृत्तपत्र जर माहित नसेल तर ही बौद्धिक दिवाळखोरी असल्याचे म्हणत तभातून संजय राऊतांना लक्ष करण्यात आले. तभातून संजय राऊतांवर जरी निशाणा साधला जात असला तरी उद्धव ठाकरेंवर यातून कोणतीही टीका करणे टाळले आहे.

तरुण भारतमधून संजय राऊतांवर टीका करण्यात आल्यानंतर आपल्याला तरुण भारत माहिती नसल्याचे राऊत म्हणाले. त्यानंतर आज पुन्हा एकदा तरुण भारतमधील अग्रलेखातून राऊतांवर जळजळीत टीका करण्यात आली. तरुण भारत मला माहिती नाही, असे सांगून एकप्रकारे आपल्या बौद्धिक दिवाळखोरीचे महाराष्ट्रासमोर प्रदर्शन करणार्‍या स्वयंघोषित अनुभवी पत्रकाराचे अभिनंदनच करावे लागेल. पण तभा म्हणजे तरुण भारत हे संपूर्ण महाराष्ट्राला ठावूक आहे.

प्रत्येक वेळी पक्षप्रमुखांना अडचणीत आणण्याचा चंगच त्यांनी बांधला आहे की काय, अशी शंका अधिक दृढ व्हावी, असेच त्यांचे वागणे दिसत आहे. राज्यात जनतेला फक्त भाजपचे सरकार नको आहे त्यांना महायुतीचे सरकार हवे आहे आणि असे झाले नाही, तर ‘विनाशकाले विपरित बुद्धी’चा दोष माथी मारुन घेण्याच्या पलीकडे शिवसेनेकडे काहीही उरणार नाही असे देखील तरुण भारतच्या अग्रलेखात म्हणले आहे.

Visit : Policenama.com