RSS Nagpur Headquarter | नागपूरमधील संघाचे मुख्यालय उडवून देण्याचे धमकी पत्र पाठवणारा अटकेत

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – अनेक दिवसांपासून पोलिसांना वारंवार धमकीची पत्रे मिळत आहेत. आता नागपूरमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय (RSS Nagpur Headquarter) उडवून देण्याची धमकी पत्राद्वारे पोलिसांना देण्यात आली होती. एका निनावी पत्राद्वारे ही धमकी (RSS Nagpur Headquarter) देण्यात आली होती. पोलिसांनी या प्रकरणी एकाला ताब्यात घेतले आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संघाचे रेशीमबाग येथील कार्यालय (RSS Nagpur Headquarter) उडवून देण्याची धमकी एका निनावी पत्रात आली होती. हे निनावी पत्र 25 नोव्हेंबर 2022 रोजी सक्करदरा पोलीस ठाणे येथे आले होते. पोलिसांनी या पत्राबद्दल तपास केला असून, याप्रकरणी एका तरुणाला अटक केली आहे. महापारेषणचा अभियंता असलेल्या या तरुणाने हे पत्र दिल्याचे उघड झाले आहे. ज्याने हे पत्र पाठवले, त्या तरुणाने आपली मानसिक स्थिती ठीक नसल्याचे सांगितले आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

 

यापूर्वीदेखील मुंबई वाहतूक पोलिसांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हत्या होणार असल्याची धमकी पाठविण्यात आली होती.
पोलिसांना अनेक ऑडिओ क्लिप्स संशयित आरोपीने पाठवल्या होत्या.
कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम आणि त्याची टोळी हा कट रचत असल्याचे यात म्हटले होते.
त्यामुळे महाराष्ट्र पोलीस सतर्क झाले होते.
पण, पोलीस तपासात या ऑडिओ क्लिप्स फसव्या आणि बनावट असल्याचे निष्पन्न झाले.
संदेश पाठवणाऱ्या संशयिताचे ठिकाण पश्चिम बंगालमध्ये असल्याचे पोलीस तपासात उघड झाले होते.

 

Web Title :- RSS Nagpur Headquarter | threatening letter to blow up rss headquarters with explosives in nagpur

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Udayanraje Bhosale | माझ्यामुळे भाजपची अडचण होत असेल, तर… – उदयनराजे भोसले

MNS Chief Raj Thackeray | सिंधुदुर्गमध्ये एन्ट्री करताच राज ठाकरेंचा विरोधकांना सूचक इशारा, म्हणाले…

Police Recruitment | तृतीयपंथींचे पोलीस होण्याचे स्वप्न पूर्ण होणार, ‘मॅट’ने दिले महत्त्वाचे आदेश

Grampanchayat Elections | अनेकांना ग्रामपंचायतीचा उमेदवारी अर्ज न भरता आल्यामुळे निवडणूक आयोग स्वीकारणार ऑफलाइन अर्ज; अर्ज भरण्याच्या वेळेतही वाढ