छत्रपती संभाजीनगर : RSS On BJP Maharashtra | लोकसभा निवडणुकीत भाजपाची मोठी पिछेहाट झाली. भाजपची संख्या २३ वरून ९ वर आली. लोकसभेला संघाने पाठ फिरवल्यामुळे महाराष्ट्रात भाजपची पिछेहाट झाली होती. मात्र आता संघ विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी भाजपसोबत मैदानात उतरणार आहे. संघाकडून रणनीतीही ठरवली जात आहे.
भाजपच्या सध्याच्या राजकीय धोरणांवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासमोर तीव्र नाराजी व्यक्त केली आणि जुन्या कार्यकर्त्यांना मुख्य प्रवाहात स्थान देण्यात यावे, अशी भूमिका मांडली. तसेच पक्षाचा ‘ग्राउंड लेव्हल’ संपर्क कमी झाल्याचेही निदर्शनास आणून दिले आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर असताना त्यांनी संघाच्या प्रभावशाली पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी मंत्री अतुल सावे यांची उपस्थिती होती. बैठकीत संघाने फडणवीस यांना स्पष्ट शब्दांत आपल्या भावना सांगितल्या. त्यानुसार त्यांनी भाजपची राज्यात नेमकी काय अवस्था आहे, हे थेट सांगितले.
पक्षाचा वास्तव परिस्थितीशी असलेला संपर्क कमी झाला आहे. भाजपने आता जमिनीवरील वास्तव जाणून घेतले पाहिजे.
यासाठी आता जुन्या कार्यकत्यांना पुन्हा मुख्य प्रवाहात आणले पाहिजे.
आतापर्यंत जे झाले ते झाले, पण आता त्यात बदल केल्याशिवाय पर्याय नसल्याचे संघाच्या पदाधिकाऱ्यांनी फडणवीसांच्या निदर्शनास आणून दिले आहे.
तसेच सर्वांना सांभाळा, कुणाला डावलू नका मराठा, दलित आणि मुस्लिम दुखावल्याने लोकसभेत भाजपला फटका बसला होता.
विशिष्ट समाज अथवा जातींबाबत असलेली भूमिका बदलण्याची गरज असल्याचे नमूद करीत सर्व समाजांतील सर्व घटकांना सांभाळा, त्यांना डावलून चालणार नाही, असे स्पष्ट केले. मात्र, हे करतानाच हिंदुत्वाची लाइन सोडू नका, असा सल्लाही दिला आहे.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
पोलीसनामाच्या इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/policenamaa
हे देखील वाचा
Bibvewadi Pune Crime News | दिव्यांग आयुक्त असल्याचे भासवून दिव्यांगाला 39 लाखांना गंडा