RSS आणि भारत आता एकच, राष्ट्रीय स्व. संघाकडून PM इम्रान खानला ‘उत्‍तर’ (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी संयुक्त राष्ट्राच्या मंचावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (RSS) निशाणा साधला होता. संघाचे सर कार्यवाह डॉ. कृष्ण गोपाल शर्मा यांनी सांगितले की संघ फक्त भारतात आहे. संघाची जागतिक स्तरावर अजून कोणतीही शाखा नाही. जर पाकिस्तान आमच्यामुुळे नाराज आहे, तर याचा अर्थ आहे की ते भारतामुळे नाराज आहे. काहीही न करता इम्रान जगभरात आम्हाला लोकप्रियता देत आहे, ही चांगली गोष्ट आहे.

डॉ. कृष्ण गोपाल शर्मा यांनी सांगितले की जे लोक दहशतवादाने त्रस्त आहेत. ते दहशतवादाच्या विरोधात आहे. त्यांना माहित आहे की आरएसएस दहशतवादच्या विरोधात आहे. आम्ही देवाकडे प्रार्थना करतो की पाक पंतप्रधान यांनी हे असेच चालू ठेवावे आणि बोलत रहावे.

पाक पंतप्रधान इमरान खान म्हणाले की पंतप्रधान मोदी आरएसएसचे लाइफ टाइम सदस्य आहे. संयुक्त राष्ट्राला संबोधताना इमरान खान यांनी म्हणाले की काँग्रेस सरकारच्या गृहमंत्र्यांनी सांगितले होते की आरएसएसच्या कॅप्ममध्ये दहशतवाद्यांना ट्रेनिंग देण्यात येते.

काँग्रेसचे गृहमंत्री काय म्हणाले होते?
2013 साली गृहमंत्री असलेले सुशील कुमार शिंदे म्हणाले होते की, त्यांच्याकडे एक रिपोर्ट आहे की भाजप आणि आरएसएसच्या ट्रेनिंग कॅंपमध्ये हिंदू दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिले जाते. यावर अनेक प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्यानंतर शिंदेनी स्पष्ट केले की, त्यांनी हिंदू दहशतवाद नाही तर भगवा दहशतवाद म्हणायचे होते.

Visit : Policenama.com