‘गीते’मुळे भारत विश्वगुरू बनेल, सरसंघचालक मोहन भागवत यांनी सांगितलं

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे कर्म करीत रहा. गीतेच्या संस्कारामुळे भारत विश्वगुरू बनेल, असा दावा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केला आहे.

संगमनेर येथे गीता महोत्सवाला आज दुपारी उत्साहात प्रारंभ झाला. कार्यक्रमास योगगुरू रामदेव बाबा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची उपस्थिती होती. गीता परिवाराच्यावतीने स्वामी श्री गोविंदगिरी महाराज यांच्या ७१ व्या जन्मवर्षानिमित्त संगमनेर येथे ७१ हजार गीतेचे मुखोद्गत अध्याय त्यांना भेट दिले जाणार आहेत. यानिमित्त गीता परिवाराचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष संजय मालपाणी यांनी या गीता महोत्सवाचे नियोजन केले आहे.

या महोत्सवात विविध ठिकाणाहून येणारे ८ राज्यातील सुमारे ३० हजार विद्यार्थी सहभागी झाले आहेत. आज सकाळपासून गीता महोत्सवात शौर्य प्रात्यक्षिक, योग प्रात्याक्षिक, नृत्य सादरीकरणाने
संगमनेरकर मंत्रमुग्ध झाले होते.

Visit : Policenama.com

You might also like