Coronavirus : संकटाचा सामना करण्यासाठी स्वयंसेवक मदतीसाठी तयार : मोहन भागवत

पोलीसनामा ऑनलाइन – देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशा परिस्थितीत खबरदारीचा उपाय म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशात लॉकडाऊन केले आहे. यासंदर्भात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आवश्यक ती मदत करण्यासाठी तयार असल्याचे माहिती संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी दिली आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ते नागपूरात बोलत होते.

देशातील नागरिकांच्या मदतीसाठी सर्व आवश्यक त्या वस्तूंचा पुरवठा करण्याचे काम पोलीस आणि प्रशासनाच्या मदतीने स्वयंसेवकांनी सुरू केले आहे. शासन आणि प्रशासनाच्या प्रत्येक आवश्यक त्या मदतीसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक तयार आहेत. आपण सर्वांनी यावेळी नियमांचे कठोरपणे पालन केले पाहिजे, अस मोहन भागवत म्हणाले. औषधं आणि अन्य आवश्यक सेवा सर्वांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. कोरोनाविरोधातील या युद्धातील प्रमुख बाब म्हणजे सोशल डिस्टंसिंग आहे. ही आपल्या समाजाची सामूहिक जबाबदारी आहे. यावरूनच आपण कोरोनावर विजय मिळवू. हे युद्ध आपल्याला एकत्रित लढायचे आहे, असेही त्यांनी नमूद केले.