‘देशात 2 मुलं जन्माला घालण्याचा कायदा असणं गरजेचं’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सरसंघचालक मोहन भागवत यांनी देशात दोन मुलं जन्माला घालण्यासंबंधित कायदा असणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले होते, त्यामुळे लोकसंख्या नियंत्रण हा विषय संघाच्या अजेंड्यावर असल्याचे भागवत यांच्या वक्तव्यावरुन वाटत आहे. उत्तर प्रदेशातील संघाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते कार्यकर्त्यांशी बोलत होते.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथे झालेल्या बंद दाराआड चर्चेत मोहन भागवतांनी देशात दोन मुलं जन्माला घालण्याचा कायदा आणला पाहिजे असे म्हणले होते. एका वृत्तानुसार लवकरच एका भव्य राम मंदिराची निर्मिती करण्यात येईल. राम मंदिर ट्रस्ट स्थापन झाल्यानंतर संघ राम मंदिराच्या मुद्यापासून वेगळा होईल. सध्या देशातील वाढती लोकसंख्या हा चिंतेचा विषय आहे. त्यासाठी दोनच मुलं जन्माला घालण्याचा कायदा आणयला हवा, लोकसंख्या नियंत्रणात येईल असे भागवत चर्चेदरम्यान म्हणाले.

यानंतर या वक्तव्यावरुन मोहन भागवत यांना राष्ट्रवादी काँग्रेसने घेरण्याचा प्रयत्न केला आहे. जबरदस्ती नसबंदी करणार का असा सवाल राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक यांनी केला. भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संविधानात बदल करत असल्याचा आरोप कायमच डाव्या विचाराच्या पक्षांकडून करण्यात येतो. सध्या सोशल मीडियावर भागवत भारताचे नवे संविधान बनवत असल्याची एक पीडीएफ फाइल व्हायरल होत आहे. त्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. या पीडीएफ फाईलच्या मुखपृष्ठावर सरसंघचालकांचे छायाचित्र वापरण्यात आले आहे. व्हॉट्सअॅपवर हा खोटा प्रचार होत आहे.

हा खोटा प्रचार केला जात असून मोहन भागवत यांची बदनामी केली जात असल्याचा आरोप संघाकडून केला जात आहे. भागवतांच्या नावाने चूकीची महिती व्हायरल केली जात असून ती माहिती टाकणाऱ्यांविरोधात कारवाईची मागणी करण्यात आली आहे, आता या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/