‘RSS नं राज्याचे तुकडे करण्याऐवजी…’, नाना पटोलेंची जोरदार टीका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – आरएसएसने राज्याचे तुकडे करण्याऐवजी सर्वांगीण विकासाचा प्रस्ताव द्यावा असं वक्तव्य करत विधानसभा अध्यक्ष आणि काँग्रेस नेते नाना पटोले यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार टीका केली आहे. इतकेच नाही तर राज्यातील महाविकासआघाडीचे सरकार हे ब्रह्मा, विष्णु, महेश यांचे सरकार आहे असंही ते म्हणाले. संगमनेर येथील अमृतवाहिनी शेती आणि शिक्षण विकास संस्थेच्या वतीने आयोजित पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने महाराष्ट्राचे तुकडे करण्याच्या प्रस्तावाऐवजी राज्याच्या सर्वांगीण विकासाचा प्रस्ताव द्यावा असे आवाहन नाना पटोले यांनी केले. विभाजनाच्या मुद्द्यावरून आरएसएसवर टीका करताना नाना पटोले म्हणाले, “संघाच्या मा गो वैद्य यांनी राज्याचे चार राज्यांमध्ये विभाजन करण्याचे वक्तव्य केले होते. त्यांनी महाराष्ट्राचे तुकडे करण्याऐवजी सर्वांगीण विकासाचे प्रस्ताव द्यावे.”

पुढे बोलताना नाना पटोले म्हणाले, “राज्यातील महाविकासआघाडीचे सरकार हे ब्रह्मा, विष्णु, महेश यांचे सरकार आहे. या सरकारने सर्वप्रथम शेतकरी कर्जमाफी करून मोठा निर्णय घेतला.” जातीनिहाय जणगणनेच्या ठरवाचे महत्त्व सांगताना ते म्हणाले, “जातीनिहाय जनगणनेमुळे जाती-जातीमधील भांडणं संपुष्टात येतील.” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/